अ‍ॅपशहर

दिराच्या प्रेमात वहिनी वेडी झाली; पतीचा काटा काढला, आकस्मिक मृत्यू भासवला; पण २५ दिवसांनी...

Akola Crime: पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याच्या अनेक धक्कादायक आणि भयानक घटना समोर येत आहेत. नुकतीच अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात अशीच एक घटना घडली होती. आता पुन्हा अकोल्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. दिराच्या प्रेमात वेड्या झालेल्या वहिनीनं क्रूरतेचा कळस गाठत पतीला संपवल्याचा प्रकार घडला आहे.

| Edited byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Dec 2022, 11:14 am
अकोला: पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याच्या अनेक धक्कादायक आणि भयानक घटना समोर येत आहेत. नुकतीच अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात अशीच एक घटना घडली होती. आता पुन्हा अकोल्यातून अशीच एक घटना समोर आली आहे. दिराच्या प्रेमात वेड्या झालेल्या वहिनीनं क्रूरतेचा कळस गाठत पतीला संपवल्याचा प्रकार घडला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम akola murder


पतीचा मावसभाऊ सातत्याने घरी यायचा. यातच दोघांची नजराजर झाली आणि हळूहळू संवाद वाढल गेला. त्यातून जवळीकत निर्माण झाली, सूत जुळलं. या संबंधांमध्ये पती अडसर ठरू लागल्यानं पत्नीने प्रियकराच्या (दिराच्या) मदतीने पतीची गळा आवळून हत्या केली. ही हत्या नसून आकस्मिक मृत्यू असल्याचे दोघांनी भासवलं. परंतु त्यांचं बिंग अखेर २५ दिवसांनी शवविच्छेदनातून फुटलं. पत्नी व तिच्या प्रियकराची रवानगी पोलिसांनी तुरुंगात केली. अकोला शहरातील खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा गुन्हा घडला.
चल फिरायला जाऊ! १६०० किमी अंतर कापलं; प्रेयसीला घेऊन देशाचं दुसरं टोक गाठलं अन् ४९ वेळा...
नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?
अकोला शहरातील खडकी परिसरातील म्हाडा कॉलनीत रहिवासी असलेले आकाश इंदोरे याला त्याच्या पत्नीनं २० नोव्हेंबरला प्रकृतीत बिघाड झाल्याने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु इथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणात खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस यांनी सुरू केला.

सुरुवातीला पत्नीने सांगितलं की आपल्या पतीला दारूचं व्यसन होतं. त्याला नेहमी रक्ताच्या उलट्या व्हायच्या. मृत्यूच्या पंधरा दिवसापूर्वी त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या. त्यामुळे हा आकस्मिक मृत्यू असल्याचं चित्र पत्नीने उभं केलं. पण पोलिसांना हा आकस्मिक मृत्यू नसून हत्या असल्याचा संशय आला. त्यांनी धागेदोरे शोधले असता, मृताच्या पत्नीचे म्हणजेच दिव्याचे पतीच्या (आकाश) मावस भावासोबतच सूत जुळलं असल्याचं समोर आलं.
डॉक्टर पत्नीला संपवलं; ऍब्युलन्समधून ३२१ किमी अंतर कापलं; १३०० रुपयांची पावती फाडली अन्...
आकाशच्या मृत्यूनंतर २५ दिवसांनी शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला. पोलिसांना यात आकाश इंदोरे याचा मृत्यू हा आकस्मिक नसून त्याची गळा आवळून हत्या केल्याचं समोर आलं. त्यामुळे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात खदान पोलिसांनी चौकशी केल्यावर, मृताची पत्नी दिव्या व मृताचा मावसभाऊ अजय संतोष माजरे यांना ताब्यात घेतलं. त्यांनी गळा आवळून आकाशची हत्या केल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणात खदान पोलिसांनी आरोपी पत्नी व मृताच्या मावसभावास अटक केली.

दोघांनाही पोलीस कोठडी
दरम्यान अटक केलेल्या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर न्यायालयानं या दोघांनाही १७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता आरोपींनी आकाश इंदोरे याची हत्या कोणत्या कारणासाठी केली, त्याचा हेतू काय होता, हे पोलीस कोठडीत समोर येणार आहे.

महत्वाचे लेख