अ‍ॅपशहर

वसतिगृहासाठी ठिय्या आंदोलन

वारंवार मागणी करूनही पुसद येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाने ५००हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना अद्याप वसतिगृहात प्रवेश दिला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती लक्षात घेऊन बिरसा मुंडा ब्रिगेडने पुसदच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयात गेल्या ४० तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

Maharashtra Times 3 Dec 2016, 4:00 am
म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aggitation for hostel
वसतिगृहासाठी ठिय्या आंदोलन

वारंवार मागणी करूनही पुसद येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाने ५००हून अधिक आदिवासी विद्यार्थ्यांना अद्याप वसतिगृहात प्रवेश दिला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती लक्षात घेऊन बिरसा मुंडा ब्रिगेडने पुसदच्या आदिवासी प्रकल्प कार्यालयात गेल्या ४० तासांपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

वसतिगृहात प्रवेश नाकारण्यात आलेले बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील आहेत. या मुलामुलींची बाहेर स्वतंत्र खोली घेण्याची आर्थिक स्थिती नाही. जुलैमध्ये या विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले. त्यांनी वसतिगृहात प्रवेशासाठी अर्जही केले. पण, त्यांना प्रवेश देण्यात आला नाही. ऑक्टोबर महिन्यात या विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडा ब्रिगेडने कार्यालयाला कुलूप ठोकले होते. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. पण, विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. याबाबत पुसद येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी इवनाथे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही. दरम्यान, विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा बिरसा मुंडा ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अरविंद कुडमेथे यांनी दिला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज