अ‍ॅपशहर

संत व सुधारकांची संवादी बेरीज हवी: डॉ. श्रीपाल सबनीस

‘जात, धर्म, भाषा व पंथ यांच्या संकुचित अस्मितेच्या संघर्षात मराठी व भारतीय संस्कृती उद्ध्वस्त होत आहे. अशावेळी संत, क्रांतीकारक व समाज सुधारकांमध्ये वजाबाकी नव्हे, तर संवादी बेरीज गरजेची आहे’, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. जरूड येथे रविवारी आयोजित संत तुकाराम महाराज विचार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांच्या अध्यक्षतेखाली हेसंमेलन झाले.

Maharashtra Times 19 Dec 2016, 4:00 am
म.टा. वृत्तसेवा, अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amaravati sant tukaram vichar sahitya sammelan in jarud
संत व सुधारकांची संवादी बेरीज हवी: डॉ. श्रीपाल सबनीस

(अशोकराव शेरेकर स्मृती परिसर, जरुड)

‘जात, धर्म, भाषा व पंथ यांच्या संकुचित अस्मितेच्या संघर्षात मराठी व भारतीय संस्कृती उद्ध्वस्त होत आहे. अशावेळी संत, क्रांतीकारक व समाज सुधारकांमध्ये वजाबाकी नव्हे, तर संवादी बेरीज गरजेची आहे’, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. जरूड येथे रविवारी आयोजित संत तुकाराम महाराज विचार साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे यांच्या अध्यक्षतेखाली हे
संमेलन झाले.

जरुड येथील संत गाडगेबाबा बहुउद्देशीय आश्रमतर्फे आयोजित या संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य रामराव वानखडे, दादाराव गवई, वरोरा येथील प्रा. जावेद पाशा, अरविंद वानखडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. सबनीस म्हणाले, ‘संतांची समता ही आध्यात्मिक पातळीवरील असली, तरी ती वर्तमानातील सामाजिक समतेची पूर्वज समता आहे. हे ऐतिहासिक सत्य आकलन करताना संत आणि सुधारकांचा समतेसंदर्भातील संवादही आज लक्षात घेणे आवश्यक आहे. एकांगी व व्यक्तिवादी प्रबोधन हे शुद्ध नव्हे. त्यामुळेच सम्यक परिवर्तन कुजले-अडले आहे. त्यासाठी संत व सुधारकांना साध्य मानू नये. सर्व प्रवाहातील संत-महात्म्यांची संवादी बेरीज प्रबोधनाची कोंडी फोडू शकेल’, असेही डॉ. सबनीस म्हणाले. संमेलनाचे प्रास्ताविक अशोक सरस्वती यांनी, तर सूत्रसंचालन वसंत वावरे यांनी केले.

उद्घाटन समारंभानंतर झालेल्या चर्चासत्रात ‘वर्तमान काळात समविचारी विचारप्रवाहात समन्वय काळाजी गरज’ या विषयावर संमेलनाध्यक्ष डॉ. लेंडे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा झाली. या चर्चासत्रात डॉ. काश‌िनाथ वऱ्हाडे, सातारा येथील सुहास फरतडे महाराज, प्रेमा लेकुरवाळे, प्रकाश राठोड, डॉ. निळकंठ मेंढे या वक्त्यांचा सहभाग होता. संमेलनातील विविध सत्रांना साहित्यप्रेमी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज