अमरावती: येथील डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात रुग्णांना सोडून परतणाऱ्या एका रुग्णवाहिकेला आग लागल्याची घटना आज पंचवटी चौकात घडली. आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रुग्णवाहिकेचं मोठं नुकसान झालं आहे. शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (Ambulance Catches Fire In Amravati) वाचा: रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा
एमएच ४० ए टी ०४२७ क्रमांकाची ही रुग्णवाहिका लेहगाव येथील रुग्णांना घेऊन आली होती. रुग्णांना डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय रुग्णालयात भरती केल्यानंतर परतीच्या मार्गावर असताना पंचवटी चौक परिसरात गाडीनं अचानक पेट घेतला. आग लागल्याचं समजताच वाहन चालकानं रस्त्याच्या कडेला रुग्णवाहिका थांबवली. स्थानिकांच्या मदतीनं अग्निशमन दलाला पाचरण करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच ही आग नियंत्रणात आणली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. रुग्णवाहिकेचा पुढचा भाग आगीत भस्मसात झाला आहे.
वाचा: महाराष्ट्रात 'लॉक'शाही! फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल