अ‍ॅपशहर

भाऊसाहेबांचे कार्य सागरासारखे : पाटील

शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे कार्य सागरासारखे आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेवून या सागरातील ग्लासभर अमृत आपण बहुजनांच्या कल्याणासाठी खर्च करावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मंगळवारी केले.

Maharashtra Times 28 Dec 2016, 4:30 am
म. टा. वृत्तसेवा, अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amrvati birth annivarsary of dr punjabrao deshmukh celebrated
भाऊसाहेबांचे कार्य सागरासारखे : पाटील


शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे कार्य सागरासारखे आहे. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेवून या सागरातील ग्लासभर अमृत आपण बहुजनांच्या कल्याणासाठी खर्च करावे, असे आवाहन गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी मंगळवारी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ११८व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथि म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री. शिवाजी शिपण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरूण शेळके, प्रमुख अतिथी म्हणुन सिबॉयसीस युनिर्व्हसिटी ऑफ अप्लाइड सायन्स, इंदूर कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, महापौर चरणजीत कौर नंदा, डॉ. देवीसिंह शेखावत, माजी मंत्री वसुधाताई देशमुख, पुष्पाताई बोंडे उपस्थित होते.

भाऊसाहेबांचे विचार दिशादर्शक व मार्गदर्शक आहेत. भाऊसाहेब दूरदृष्टीचे नेते होते. त्यांचा वसा घेवून श्री शिवाजी शिक्षण संस्थेने आपली वाटचाल सुरु केली आहे. भाऊसाहेबांच्या कार्यापासून समाजाने प्रेरणा घेण्याचे आवाहन डॉ. पाटील यांनी केले.

यावेळी कुलगुरु डॉ. माणिक साळुंखे यांनीही आपले मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात अॅड. शेळके यांनी संस्थेच्या प्रगतीच्या कार्याचा आढावा घेतला. संस्था यापुढेही अपेक्षित वाटचाल करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती केंद्रावरील भाऊसाहेबांच्या पुतळयाला उपस्थित पाहुण्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, उत्कृष्ट शाळा यांना पुरस्कार व प्राविण्यप्राप्त विद्यार्थी पुरस्काराची घोषणा करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष डॉ. सुरेश ठाकरे यांनी तर संचालन किशोर फुले व आभारप्रदर्शन वि. गो. भांबुरकर यांनी केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज