अ‍ॅपशहर

सीसीटीव्ही फुटेज पाहून बँक एजंटला हुडका : पालकमंत्री

शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मिळावे यासाठी अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. असे असतानाही कर्ज काढून देण्यासाठी बँकेत एजंट सक्रिय झाले आहेत. त्याबद्दल अनेक तक्रारी येत असल्याने बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून अशा एजंटवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी दिले. अशा एजंटला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

Maharashtra Times 27 Jun 2016, 4:04 am
म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम check cctv footage for bank agent
सीसीटीव्ही फुटेज पाहून बँक एजंटला हुडका : पालकमंत्री

शेतकऱ्यांना त्वरित कर्ज मिळावे यासाठी अनेक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. असे असतानाही कर्ज काढून देण्यासाठी बँकेत एजंट सक्रिय झाले आहेत. त्याबद्दल अनेक तक्रारी येत असल्याने बँकेतील सीसीटीव्ही फुटेज तपासून अशा एजंटवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री संजय राठोड यांनी शुक्रवारी दिले. अशा एजंटला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

दारव्हा येथे राठोड यांच्या उपस्थितीत कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी बँकेत एजंटशिवाय कर्ज मिळत नसल्याच्या तक्रारी पालकमंत्र्याकडे केल्या. यावेळी बँक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना त्वरित कर्ज देण्याचे आदेश त्यांनी दिले. कर्ज न मिळाल्यास शेतकऱ्यांना सावकाराकडे जावे लागेल. ही वेळ त्यांच्यावर आणू नका, असेही ते म्हणाले.

पावसाने दगा दिल्याने यवतमाळ जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतकरी संकटात सापडला आहे. धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागण्याचाही धोका आहे. त्यातच कर्ज पुनर्गठन न झाल्याच्या कारणावरून शेतकऱ्यांची बॅंकेकडून अडवणूक केली जात आहे. याविरोधात वारंवार इशारा देऊनही अडवणूक सुरूच असल्यावरून शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. सरकारने याविषयी ठोस भूमिका जाहीर करावी, अशी मागणीही केली जात आहे. त्यावर आता पालकमंत्र्यांनी ठोस भूमिका जाहीर केल्याने समाधान व्यक्त होत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज