अ‍ॅपशहर

क्विंटलला १४ हजारचा भाव असताना शेतकर्‍यांच्या पदरी निराशाच, पावसामुळे 'या' पिकांना बसला फटका

Amravati News Today : राज्यात गणेशोत्सवानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. याच सततच्या पावसामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले असून यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Sep 2022, 8:53 am
अमरावती : अमरावती जिल्ह्यातून पावसाने अद्याप एक्झिट घेतलेली नाही. आकाशात ढगांच्या दाटीमुळे सायंकाळी अंधारून आले होते. ढगांची दाटी संपूर्ण जिल्हाभर कायम असल्याचा फटका आता तूर, सोयाबीन, कपाशी केळी आणि संत्रा या पिकांना बसत आहे. सततच्या पावसाने कपाशीचे बोंड सडू लागले असून एकीकडे १४ हजार भाव असताना शेतकऱ्यांना हे नुकसान पचवणे कठीण जात आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amravati farmer news live


जिल्ह्यातील परतवाडा चांदुर बाजार, चांदुर रेल्वे दिवसा, अचलपूर, अंजनगाव, वरुड, मोर्शी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा उत्पादक शेतकरी आहेत. जिल्ह्यात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सतत धार पावसामुळे शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे.

अमरावती- बडनेरा शहरात दुपारी १२ पासून पाऊस टप्याटप्प्याने आला. चांदूर रेल्वे येथे जोरदार पावसाने आठवडी बाजाराचे नुकसान झाले. भातकुली तालुक्यात टाकरखेडा शंभू अचलपूर, पुरातही मुसळधार पाऊस कोसळला. चांदूर बाजारात मुसळधार पावसाची नोंद झाली. दर्यापूर, येवदा व परिसरात विजेच्या कडकडाटासह पावसाने बॅटिंग केली. शिरजगाव कसबा येथील गणेश विसर्जन सोहळ्यात पावसाचा मारा सहन करावा लागला. त्यामुळे दुपार पासूनच अंधाराचे सावट होते. अंजनगाव सुर्जी येथे दिवसभरापासून पाऊस भन्नाट कोसळत होता. ढगांच्या दाटीने दुपारी ४ वाजताच अंधार पसरला. तथापि, या पावसामुळे कुठेही नुकसान झाल्याची नोंद नाही.

काळजी घ्या! ठाणे जिल्ह्यातही लंपीचा शिरकाव; काय आहेत लक्षणे
ढगफुटीसदृश पावसामुळे तीन गावामध्ये शिरले पाणी

धामणगाव रेल्वे तालुक्याला रविवारी सहाव्यांदा अतिवृष्टीने झोडपले. आठ गावांमध्ये ९० मिमीपेक्षा अधिक ढगफुटीसदृश पाऊस कोसळला. ११ घरांची पडझड झाली तर तीन गावांमध्ये पावसाचे पाणी शिरले. यात विरुळ रांधे, वाघोली, गुंजीचा समावेश आहे. विदर्भ, मोती कोळसा, वर्धा नद्या फुगल्याने तालुक्यातील अनेक मार्गावर वाहतूक बंद झाली होती.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख