अमरावती : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात अंतर्गत येणाऱ्या काटी गावातील एक १६ वर्षीय युवती बेपत्ता असल्याची तक्रार कुटूंबियांनी पोलीसात दिली. मात्र, त्याच युवतीचा गळफास घेवून लटकलेल्या अवस्थेतला मृतदेह घराच आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेचा तपास पोलीस घेत आहेत. तालुक्यातील काटी येथील १६ वर्षीय विद्यार्थिनीने घरातच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत युवती ही गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी बेनोडा पोलिसांत दिली होती. रागिनी रत्नाकर कुटे (१६) रा. काटी असे मृत युवतीचे नाव आहे.
मृतक रागिणी ही २० जुलै रोजी सकाळपासून बेपत्ता होती. तेव्हापासून तिचा शोध सुरू होता. गुरुवारी मृत रागिणीचे काका घरातील धाब्यावर लोखंडी तार आणण्यासाठी गेले असता, त्यांना तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दगडाच्या पायरीवर आढळून आला. त्यांनी लगेच कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.
बेनोडा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. रागिणीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास बेनोडा शहीद पोलीस करत आहेत.