अ‍ॅपशहर

शेतकऱ्यांना त्रास दिल्यास सोडणार नाही - बच्चू कडू

Maharashtra Times 21 Oct 2021, 2:18 pm
अमरावती : अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलचा विजय झाला. यामध्ये त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या परिवर्तन पॅनलचा पराभव केला. ही निवडणूक आरोप प्रत्यारोपनाने चांगलीच गाजली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bacchu kadu


काल झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीत सहकार पॅनलचे अध्यक्षपदी सुधाकर भारसाकळे तर उपाध्यक्षपदी सुरेश साबळे विजयी झाले. विशेष म्हणजे या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर व मंत्री बच्चू कडू यांचं वेगळं वेगळं पॅनल होतं. तर बच्चू कडू स्वतः या निवडणुकीच्या रिंगणात होते.
समीर वानखेडेंवर वसुलीचे आरोप; नवाब मलिक यांनी मालदीव, दुबईमधले फोटो केले शेअर
बच्चू कडू संचालकपदी विजयी झाले. मात्र, त्यांच्या पॅनलच्या या निवडणुकीत दारूण पराभव झाला. तर पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीनंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली. परिवर्तन हे विचारांच होतं, खुर्चीचं नव्हतं. आता नवीन अध्यक्ष व उपाध्यक्ष शेतकरी पुत्र झाले तर शेतकऱ्यांना त्रास होऊ नये ही अपेक्षा बच्चू कडू यांनी व्यक्त करत चुकीच्या कामाबद्दल कोणाला सोडणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया देत ही बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. महिलांना उद्योगासाठी कर्ज देऊन महिलांना सक्षम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज