अ‍ॅपशहर

'तुम्हांला अटक होईल', असे सांगताच चार आरोपींनी केले महिला पोलिस अधिकाऱ्याशी धक्कादायक कृत्य

चौकशीअंती तुम्हाला अटक करायची आहे, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका कोठावार यांनी सांगताच बाबू चुडेसोबत असलेल्या दोघांपैकी एका महिलेने थेट एपीआय कोटावार यांचा गळा दाबला. तर दुसऱ्या एका महिलेने व बाबू चुडे यांनी मारहाण केली. यात एपीआय कोठावार यांच्या गळ्याला दुखापत झाली. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी एपीआय कोठावार यांची सुटका केली.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byसुनील तांबे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 May 2022, 6:32 pm
अमरावती: एका युवकाला मारहाण करून त्याच्याकडील रक्कम लुटल्याच्या प्रकरणात पोलीस आरोपींना चौकशीअंती अटक करत असतानाच दोन महिला व दोन पुरुषांनी राजापेठच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) प्रियंका कोठेवार यांच्या अंगावर धाव घेऊन त्यांना मारहाण केली. तसेच दोनपैकी एका महिलेने त्यांचा गळा दाबला. ही घटना राजापेठ ठाण्याच्या हॉलमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करून दोघांना अटक केली आहे. (accused committed a shocking act against a female police officer)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम in amravati the accused committed a shocking act against a female police officer
'तुम्हांला अटक होईल', असे सांगताच चार आरोपींनी केले महिला पोलिस अधिकाऱ्याशी धक्कादायक कृत्य


राजापेठ पोलिसांनी शहरातील विजयनगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला व महिलेला चौकशीसाठी बोलवले होते. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी बाबू ऊर्फ योगेश चुडे (५०, रा. विजयनगर, अमरावती) याच्यासह एका महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. याच प्रकरणात तेजस चुडे व अन्य एक महिला यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात शिवम उमाकांत लोखंडे (२४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पाण्याची कॅन चुडेच्या घरात असल्याची माहिती मिळाल्यामुळे शिवम ती कॅन परत आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी बाबू चुडे व अन्य तिघांनी शिवम यांना मारहाण केली. तसेच खिशातील ४ ते ५ हजार रुपये जबरीने काढून घेतले. या प्रकरणाची चौकशी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका कोठावार करत होत्या.

क्लिक करा आणि वाचा- ४ तास बँकेत बसली मग वृद्धासोबत गाठलं घर; १७ वर्षीय तरुणीचा प्रताप वाचून हादराल

चौकशीअंती तुम्हाला अटक करायची आहे, असे एपीआय कोठावार यांनी सांगताच बाबू चुडेसोबत असलेल्या दोघांपैकी एका महिलेने थेट एपीआय कोटावार यांचा गळा दाबला. दुसरी महिला व बाबू चुडे यांनी मारहाण केली. यात एपीआय कोठावार यांच्या गळ्याला दुखापत झाली. त्यावेळी उपस्थित पोलिसांनी एपीआय कोठावार यांची सुटका केली.

क्लिक करा आणि वाचा- समाजासमोर ठेवला आदर्श; विधवा भावजयीचे अश्रू पुसत दिराने बांधली लग्नगाठ

त्यानंतर बाबू चुडे व त्याच्यासोबतच युवकाने एपीआय कोठावार यांना धमकी दिली की, तुला बाहेर कापून टाकतो व खून करतो. त्यानंतर बाबू चुडेने त्याच ठिकाणी दुपट्ट्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करुन तुला फसवतो, अशी धमकी दिल्याचे एपीआय कोठावार यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी बाबू चुडे, तेजस चुडे व दोन महिला यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- अचलपूर, परतवाड्यात अतिरेकी संघटना सक्रिय!, सत्यशोधन समितीचा धक्कादायक दावा

पोलिसांनी बाबू चुडे व एका महिलेला लुटमार प्रकरणातील गुन्ह्यात अटक केली. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. याबाबत अधिक माहिती देताना ठाणेदार मनीष ठाकरे म्हणाले, की बाबू चुडे व त्यांच्यासोबत आलेल्या तिघांविरुद्ध ठाण्यात येऊन महिला पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच बाबू चुडे व एका महिलेला लूटमार प्रकरणात अटक केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज