अ‍ॅपशहर

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा

शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांचे सात-बारा कोरे करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या जाचातून महिलांची मुक्तता करावी यासह विविध मागण्यांकरिता आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेद्वारे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.

Maharashtra Times 29 Dec 2016, 4:00 am
म. टा. वृत्तसेवा, अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम loan free farmers
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा


शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून त्यांचे सात-बारा कोरे करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी, मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या जाचातून महिलांची मुक्तता करावी यासह विविध मागण्यांकरिता आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानी संघटनेद्वारे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.

जिल्ह्यातील शेतकरी सध्या तूर पिकावर आलेल्या रोगामुळे संकटात अडकला आहे. शेतकरी हवालदिल झाला असताना आमदार राणांनी शेतीच्या प्रश्नाला उचलून धरत मोर्चाचे आयोजन केले होते. स्थानिक गद्रे चौक परिसरातून हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षवेधी होती. अमरावीतसह संपूर्ण जिल्ह्यातून नागरिक यात सहभागी झाले होते. दुपारी २ वाजताच्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. सभेला संबोधित करताना राणांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची आवाहन शासनाला केले. शहरासह जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर त्यांनी भाष्य केले. व्यासपीठावर नवनीत रवी राणा यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी हजर होते. यानंतर राणा, नवनीत राणा दोघेही रोगाच्या प्रार्दूभावामुळे खराब झालेले तुरीचे झाड घेवून बैलबंडीवर स्वार झाले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापासून काही अंतरावर थांबविण्यात आला होता. राणांनी त्यांची बैलबंडी प्रवेशद्वारापर्यंत नेण्याची मागणी केली. परंतु पोलिसांनी त्यास नकार दिला. अखेर ठराविक अंतरापर्यंत बैलबंडी नेण्याची परवानगी दिली. यानंतर राणा बैलबंडीसह प्रवेशद्वाराजवळ पोहोचले.

घरे नसणाऱ्यांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, गोरगरिबांना विनाविलंब बीपीएल कार्ड यादीत समाविष्ट करून प्रमाणपत्र कार्ड वितरीत करण्यात यावे, अमरावती-बडनेरातील विविध झोपडपट्ट्या अधिकृत घोषित करण्यात याव्या, संजय गांधी, श्रावण बाळमधील निराधार, अनाथ, अपंग व विधवा यांचे सध्या असलेले प्रतिमाह सहाशे रुये मानधन वाढवून दोन हजार रूपये करण्यात यावे, बडनेरा ते नांदगाव पेठ एमआयडीसीपर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करावी, आदी मागण्यांचे
निवेदन जिल्हाधिकारी गित्ते यांना सोपविण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज