अ‍ॅपशहर

पळून जाऊन लग्न करुया, निर्वस्त्र होऊन व्हिडिओ कॉल कर! अन्यथा..., अमरावतीमधला धक्कादायक प्रकार

chandur crime news : तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात पवित्र नात्यांनासुद्धा कलंक लावणाऱ्या काही घटना दिवसेंदिवस समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byटीम मटा ऑनलाइन | Maharashtra Times 25 Dec 2021, 4:12 pm
अमरावती : तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात पवित्र नात्यांनासुद्धा कलंक लावणाऱ्या काही घटना दिवसेंदिवस समोर येत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्याच्यासोबत लग्न जुळले होते, त्याच भामट्याने नको तो प्रताप केला केला. पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर संबंधित युवकाविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra amravati chandur crime news young man threatens to make pornographic photos viral for girl


शहरात राहणाऱ्या एका युवतीचे चांदूर बाजारला राहणाऱ्या एका युवकासोबत मागील वर्षी लग्न जुळले होते. मात्र, काही दिवसानंतर युवतीच्या कुटुंबीयांनी हे लग्न तोडले. त्यावेळी युवतीचे संबंधित युवकासोबत मोबाइलद्वारे संभाषण सुरु होते. दरम्यान, आपण पळून जाऊन लग्न करु, तू निर्वस्त्र होऊन मला व्हिडिओ कॉल कर, अशी मागणी त्याने युवतीकडे केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी त्या युवकाने युवतीचे अश्लील छायाचित्र तिच्या नातेवाईकांना पाठवून पाच लाख खंडणी न दिल्यास हे छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी दिली. या प्रकरणी युवतीने नागपूरी गेट पोलिस ठाण्यात तक्रारीवरून पोलिसांनी त्या युवकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

मार्च २०२१ मध्ये शहरातील युवतीचे चांदूर बाजारला राहणाऱ्या युवकासोबत लग्न जुळले होते. त्यानंतर ते एकमेकांशी फोनवर बोलत होते तसेच व्हिडिओ कॉलद्वारे संपर्कात होते. मात्र, या दोघांच्या लग्नाला युवतीच्या कुटुंबीयांनी नकार दिला. त्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकले नाही. त्यानंतरही हा युवक युवतीला कॉल करून धमकावत म्हणायचा की, "माझ्यासोबत पळून चल, अन्यथा कपडे न घातलेल्या अवस्थेत व्हिडिओ कॉल कर", अशी मागणी त्याने केली. तसंच आपल्यातील गोष्टी तुझ्या भावाला सांगणार नाही, असंही तो पीडितेला म्हणाला. त्यामुळे पीडितेने तीन ते चारवेळा त्याच्या मागणीनुसार त्याला व्हिडिओ कॉल केले.

त्यावेळी युवकाने व्हिडिओ कॉलदरम्यान स्क्रीन शॉट द्वारे युवतीचे आक्षेपार्ह फोटो काढले. हे फोटो काही दिवसांनी पीडित महिलेच्या बहिण तसेच काका व काकूंच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आले. त्यामुळे पीडितेच्या भावाने फोटो पाठवणाऱ्या मोबाइल क्रमांकाचा शोध घेतला. यावेळी सदर क्रमांक हा एका महिलेचा असल्याचे समोर आले. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी पीडितेच्या बहिणीच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला.

फोटो पाठवणाऱ्या महिलेचा भाऊ बोलत असल्याचे सांगून आपल्याकडे तुझ्या बहिणीचे आणखी अश्लील फोटो असल्याचे तो म्हणाला. ५ लाखांची खंडणी द्या; अन्यथा सर्व फोटो सोशल मीडियावर प्रसारित करेल, अशी धमकी त्याने दिली. त्यामुळे पीडिताने नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज