अ‍ॅपशहर

मतीन हे नव्या प्रवाहाचे प्रतिनिधी!

समाजात माणसांची किंमत ही पैशावरून ठरत असताना ही समाजव्यवस्था बदलविण्यासाठी अनेक नवे प्रवाह पुढे येतात. अशा प्रवाहांचे प्रतिनिधित्व मतीन भोसले करीत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले.

Maharashtra Times 27 Dec 2016, 11:16 pm
म. टा. वृत्तसेवा, अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम matin bhosle feliciated in amrawati
मतीन हे नव्या प्रवाहाचे प्रतिनिधी!


समाजात माणसांची किंमत ही पैशावरून ठरत असताना ही समाजव्यवस्था बदलविण्यासाठी अनेक नवे प्रवाह पुढे येतात. अशा प्रवाहांचे प्रतिनिधित्व मतीन भोसले करीत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी केले.

जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे फासे पारधी मुलांसाठी मतीन भोसले यांनी ‘प्रश्नचिन्ह’ ही निवासी आश्रमशाळा सुरू केली आहे. मतीन यांना रविवारी ‘आम्ही सारे कार्यकर्ता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संजय आवटे बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी किरण गित्ते, शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत वानखडे, फाऊंडेशनचे अध्यक्ष अविनाश दुधे उपस्थित होते. आवटे म्हणाले, माणसाला त्याच्या आतील आवाज ऐकू येऊ नये अशी ही समाजव्यवस्था आहे. मतीन यांनी याला फाटा दिला असून आतला आवाज ऐकत आहे. त्यांचे हे कार्य समाजाला आवाहन करणारे आहे. आश्रमशाळा संवेदनांच्या कक्षा रुंदावणारे ‘प्रश्नचिन्ह’ आहे, असेही आवटे म्हणाले. प्रास्ताविक संतोष अरसोड यांनी तर संचालन प्रा. डॉ. अरुणा वाडेकर यांनी केले.

आव्हान स्वीकारल्यानेच आज इथे : मतीन भोसले

पारधी समाजाची परिस्थिती पाहून आपण निराश झालो होतो. परंतु आमच्या अस्तित्वावर लागलेले प्रश्न सोडविण्यासाठी आपण उत्तराकडे झेप घेतली. शासकीय नोकरी सोडली. हे आव्हान स्वीकारले नसते तर आज तुमच्यापुढे उभे राहणे शक्य नव्हते, असे सत्काराला उत्तर देताना मतीन भोसले यांनी म्हटले. सत्कार सोहळ्याला मतीन याच्या पत्नी सीमा, आई सखुबाई, वडील शंकर भोसले यांच्यासह प्रश्नचिन्ह शाळेचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज