अ‍ॅपशहर

लोकांनी पाण्यासाठी सोडले गाव; गेल्या २८ दिवसांपासून ग्रामस्थ पाण्याविना

जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुर या गावात नेहमीच पाणी टंचाई असते. अशातच आता या गावातील फक्त वार्ड नंबर एक मध्ये मागील २८ दिवसांपासून ग्रामपंचायतने पाणी पुरवठा केला नसून गावाच्या इतर भागात नियमित पाणी पुरवठा होत असल्याचा

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Feb 2022, 4:30 pm
अमरावतीः जिल्ह्यातील चांदुर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापुर या गावात नेहमीच पाणी टंचाई असते. अशातच आता या गावातील फक्त वार्ड नंबर एक मध्ये मागील २८ दिवसांपासून ग्रामपंचायतने पाणी पुरवठा केला नसून गावाच्या इतर भागात नियमित पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करत येथील महिलांनी थेट गाव सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी रात्रीपासून वार्ड नंबर एक मधील नागरीकानी गावापासून दोन किलोमीटर वर जाऊन ठिय्या मांडला आहे. या भागात तंबल २८ दिवसांपासून ग्रामपंचायतने पाणी पुरवठाच केला नसल्याचा आरोप केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम amravati-news


चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर येथील वॉर्ड क्र.१ येथील नळ एक महिन्यापासून बंद आहे. गावातील इतर वॉर्डात नळाव्दारे मुबलक पाणी मिळते. मात्र वॉर्ड क्र.१ हा दलित वस्ती असल्यामुळे सावंगी मग्रापूर ग्राम पंचायत सुडाचे राजकारण करीत असुन मागील वीस वर्षापासून त्यांना पाण्यासाठी वंचित राहावे लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

वाचाः सख्ख्या बहिणीला घरात आसरा दिला पण घडलं असं काही की पोलिसही चक्रावले
सावंगी मग्रापूर येथील वार्ड क्र.१ मध्ये ९० टक्के दलित बांधव राहत असुन बोटावर मोजता येईल ऐवढ्यांकडे नळ आहेत. या वार्डातील नागरिकांनी नळ कनेक्शन मिळण्याकरीता सतत मागणी केलेली आहे. मात्र सावंगी म्रग्रापूर सरपंच व उपसरपंच यांनी हेतु पुरस्पर आणि द्वेष भावनेने एका महिन्यापासून वार्ड क्र.१ चा संपूर्ण पाणीपुरवठा बंद केला आहे. याबाबत विचारणा करण्यास गेल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात आल्याची माहिती नागरिकांनी दिली.

वॉर्ड क्र.२ व ३ मध्ये मुबलक पाणी मिळते. मात्र वॉर्ड क्र.१ मध्ये वीस वर्षापासून पाण्याची समस्या सतावत आहे. फक्त राजकीय भावनेतून अनुसूचित जातीच्या लोकांना मुलभुत गरज असलेल्या पाण्यापासुन वंचित ठेवुन त्यांना मानसिक त्रास सरपंच व उपसरपंच देत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

वाचाः धक्कादायक! करोना चाचणीसाठी तरुणीच्या गुप्तांगातून घेतले स्वॅब, आरोपीला पडलं महागात

मागील एक वर्षापासून याविषयी वेळोवेळी ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसिलदार, पोलिस स्टेशन व जिल्हाधिकारी यांच्यासमोर समस्या मांडल्या. मात्र अद्याप कोणीही कार्यवाही करून आम्हाला न्याय दिलेला नाही.त्यामुळे वार्ड क्र.१ सर्व नागरिक कुटूंबासह गावावर बहिष्कार टाकुन आमची पाण्याची मुलभुत गरज सुटेपर्यंत गावाबाहेरच्या पाणवठ्यावर आंदोलन करणार आहे. त्यांच्या जीवाची व घरदाराची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहिल असे तक्रारकर्त्यांनी लेखी कळविले आहे. या तक्रारीची प्रत गटविकास अधिकारी यांना दिली आहे. तक्रार अर्जावर सावंगी मग्रापूर येथील वार्ड क्र.१ येथील ८५ महिलांच्या सह्या केल्या आहेत.

वाचाः महावितरणचा गलथान कारभार; शॉर्टसर्किटमुळं १९ एकर ऊस जळाला; तीन शेतकऱ्यांचे नुकसान

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज