अ‍ॅपशहर

नवजात बालकांच्या मृत्यूनंतर डॉक्टरांना मारहाण

एकाच वेळी चार नवजात बालकांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर अमरावतीमधील पंजाबराव देशमुख रुग्णालयात तणावाचं वातावरण आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळंच आमच्या मुलांचा मृत्यू झाला, असा आरोप करणाऱ्या मृत मुलांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयातील डॉक्टर भूषण कट्टा यांना मारहाण केल्याचं वृत्त आहे. यामुळं रुग्णालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra Times 29 May 2017, 2:07 pm
शैलेश धुंदी । अमरावती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम relatives attacks doctor after infant deaths in amravati
नवजात बालकांच्या मृत्यूनंतर डॉक्टरांना मारहाण

एकाच वेळी चार नवजात बालकांच्या मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर अमरावतीमधील पंजाबराव देशमुख रुग्णालयात तणावाचं वातावरण आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळंच आमच्या मुलांचा मृत्यू झाला, असा आरोप करणाऱ्या मृत मुलांच्या कुटुंबीयांनी रुग्णालयातील डॉक्टर भूषण कट्टा यांना मारहाण केल्याचं वृत्त आहे. यामुळं रुग्णालयात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पंजाबराव देशमुख रुग्णालयात रविवारी रात्री उपचार सुरू असताना चार नवजात बालकांचा अचानक मृत्यू झाला. डॉक्टर कट्टा हे दारू पिऊन ड्युटी करत होते. त्यांनी दिलेल्या औषधाच्या रिअॅक्शनमुळंच बालकं दगावल्याचा नातलगांचा आरोप आहे. या नातलगांसोबत मनसेचे पदाधिकारी बंडू आठवले, संतोष बद्रे, बच्चू रेळे, पवन दळवी हे आज रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. दिलीप जाणे यांना भेटण्यासाठी आले होते. डॉ. कट्टा हेही यावेळी तिथंच होते. त्यांना पाहून संताप अनावर झालेल्या मृत बालकांच्या नातलगांनी त्यांना मारहाण केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी व तेथील सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करून त्यांना शांत केलं. मात्र, त्यानंतरही गोंधळ सुरूच होता. कट्टा व त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी एका मृत बालकांच्या नातलगांनी केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज