अ‍ॅपशहर

संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईला उशीर झाला, नवनीत राणांची खोचक टीका

संजय राऊत यांच्यावर आज सकाळपासून ईडीची कारवाई सुरू आहे. राऊत यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संजय राऊत यांच्या घरासह ईडीच्या तीन पथकांकडून मुंबईत कारवाई केली जात आहे. या चौकशीवरून आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राऊत यांच्याकडे इतकी संपत्ती आली कुठून?, असा सवाल नवनीत राणा यांनी केला आहे.

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Jul 2022, 12:28 pm
अमरावती : शिवसेनेचे नेते व राज्यसभा खासदार संजय राऊत यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. यावर आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटातील आमदार आणि भाजप नेत्यांसह अपक्षांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी गैरव्यवहार करून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमवली आहे, असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे. तर संजय राऊत यांचा पापाचा घडा भरला आहे. पत्राचाळ प्रकरणी त्यांना अटक होऊ शकते, असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sanjay raut ed news navneet kaur rana reaction
संजय राऊतांवरील ईडीच्या कारवाईला उशीर झाला, नवनीत राणांची खोचक टीका


संजय राऊतांनी गैरव्यवहारतून मोठी संपत्ती जमवली आहे. यामुळे त्यांच्यावर आज ही वेळ आली आहे. तसं बघता त्यांच्यावर ईडीची कारवाई व्हायला उशीरच झाला आहे. ही कारवाई खूप आधी होणं अपेक्षित होतं. एका साध्या पत्रकाराजवळ एवढी संपत्ती आली कुठून? हा ही एक मोठा प्रश्न आहे. संजय राऊत हे महाविकास आघाडी सरकारचे एजंट म्हणून काम करत होते. त्यांनी अनेक कंत्राटदार आणि बिल्डर लोकांना साथ देऊन एफएसआय वाढवून हजारो कोटींची मालमत्ता लाटली आहे. संजय राऊत यांनी चोरी केली नसेल तर भिण्याचे कारण नाही.

चौकशी करून संजय राऊत यांना अटक करून आधीच तुरुंगात टाकयला हवं होतं. महाराष्ट्राच्या जनतेचा, गोरगरिबांचा पैसा एखादा व्यक्ती भ्रष्टाचारातून अवैध संपत्ती जमा करत असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. महाराष्ट्राची जनता आपल्यासोबत आहे, असा दावा संजय राऊत ट्विट करून करत आहेत. पण अन्यायाविरुद्ध लढणारी ही छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्राची जनता आहे. जो कोणी भ्रष्टाचार करत असेल त्याच्या विरुद्ध जनता जाईल. कोण भ्रष्टाचारी आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेलाही कळलं पाहिजे, असं खासदार नवनीत राणा म्हणाल्या. एका साध्या पत्रकाराकडे एवढी मोठी संपत्ती असेलत तर त्याचं उत्तर त्याला द्यावं लागेल. एवढे पैसे कुठून आले?, असा सवाल नवनीत राणांनी केला.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच सुटणार कधी; महत्त्वाची सुनावणी आता ३ ऑगस्टला

केंद्र सरकार सत्तेचा दुरुपयोग करते आहे, असा आरोप केला जातोय. पण सत्तेचा गैरवापर तर तुम्ही केला. उद्धव ठाकरेंनी केला. संजय राऊतांनी केला. जे जाहीपणे एका महिलेला २० फुट खोल खड्ड्यात गाड्यानी भाषा करत होते. आणि माझ्यासारख्या महिलेला हनुमान चालीसा वाचणार म्हणून वेगवेगळे कलम लावले. आणि आता दोन दिवस आधी संजय राऊत यांची एक ऑडिओ क्लीप आली आहे. त्यात ते इतक्या वाईट प्रकारे महिलेशी बोलत आहेत, शिवीगाळ करत आहेत. पत्राचाळ व्यवहार प्रकरणी खुलेआम धमकी देत होते. या सर्व प्रकरणाचं उत्तर ईडी नक्कीच मागेल. तुमच्याकडे उत्तर नाहीए म्हणूनच तुम्ही आतापर्यंत ईडीच्या चौकशीला हजर झाला नाहीत, असा आरोप नवनीत राणा यांनी संजय राऊतांवर केला.

VIDEO: ईडी चौकशी सुरू असताना राऊत खिडकीत आले, कार्यकर्त्यांना हात दाखवला अन्...

महत्वाचे लेख