अ‍ॅपशहर

Weather Alert: पुढचे ४ दिवस राज्यावर अस्मानी संकट; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा

Weather Forecast Vidarbha Maharashtra : राज्यात बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर आणि शेतीवर याचा गंभीर परिणाम होत असल्याचं दिसतं. अशात आता हवामान खात्याकडून पुढचे ४ दिवस राज्यात अवकाळी पाऊस असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे कोणत्या राज्यांमध्ये पाऊस कोसळेल? वाचा सविस्तर...

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Mar 2023, 11:25 am
अमरावती : तापमानात सध्या मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असून बदलणाऱ्या मोसमी वाऱ्यामुळे येत्या १६ मार्च आणि १७ मार्च दरम्यान पश्चिम विदर्भातील काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे. यावेळी मध्यम स्वरूपाचा पाऊस व वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता हवामान तज्ञ डॉ. सचिन मुंडे यांनी व्यक्त केली आहे. राज्यावरील हे अवकाळीचं सावट पुन्हा एकदा शेतकऱ्यांसाठी संकट आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम weather today (1)


सध्या गहू, हरभरा, कांदा हे पीक कापणीला आले आहेत. अशातच या वादळी वाऱ्याचा फटका या पिकांना बसू नये याकरिता हवामान विभागाच्यावतीने सतर्कतेचा इशारा देत काही सूचना देण्यात आले आहेत. भाजीपाला व फळ पिकाची काढणी लवकर करून घ्यावी. परिपक्व अवस्थेतील हरभरा आणि गहू पिकांची काढणी करून घ्यावी व पिकांची काढणी केलेली असल्यास पीक सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून तडपत्रीचा साहाय्याने झाकून ठेवावे. संत्रा फळांची तोडणी करून घ्यावी. भाजीपाला आणि फळबाग पिकाला बांबू किंवा बल्लीच्या साह्याने आधार द्यावा.

Weather Alert: पुढचे काही दिवस राज्यासाठी धोक्याचे; 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस अन् गारपीटीचा इशारा

परिपक्व झालेली टरबूज आणि खरबूजाची फळे तोडून घेऊन सावलीत ठेवावी व त्यातली किडग्रस्त सडकी फळे वेगळी काढून चांगली फळे बाजारपेठेत नेण्याची व्यवस्था करावी. परिपक्व झालेले कांदा पीक काढून घ्यावे आणि ते सुरक्षित ठिकाणी ठेवावे. बाजारसमित्यामधील आणि शेतातील मळणी केलेला शेत मालाला तडपत्रीचा साहाय्याने झाकून ठेवावे किवा सुरक्षित ठिकाणी ठेवावे जेणे करून माल भिजणार नाही. स्थानिक वातावरणाचा अंदाज घेऊन शेतकरी बांधवानी शेतातील माल सुरक्षित ठिकाणी ताडपत्रीच्या सहाय्याने झाकून ठेवावा.

पोलीस हादरले! Fb वरून अखंड प्रेमात बुडाली, थेट तरुणासोबत भाड्याने राहिली तरुणी; लगेच गर्भधारणा अन्...

हंगामी पिके, फळबागा, भाजीपाला पिकामध्ये अंतरमशागतीची कामे निंदनी(खुरपणी) इत्यादी, तसेच कीड व रोग व्यवस्थापनासाठी कृषी रसायनाची फवारणी व उभ्या पिकात खते देण्याची कामे पाऊसाच्या उघडीप नंतर करावीत. मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता असल्याने शेतात काम करता असताना मेघगर्जनेचा आवाज आल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने जनावरांना गोठ्यामध्येच चाऱ्याची व्यवस्था करावी. शक्यतो जनावरे मोकळ्या चराई क्षेत्रावर चारणे टाळावे. शेतकरी बंधूनी हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला व हवामानचा पूर्वानुमाना करीता मेघदुत मोबाईल अॅपचा वापर करावा. तसेच शेतकरी बंधूंनी मेघगर्जना व विजेचा पूर्वानुमानाकरिता दामिनी अॅपचा वापर करावा असे आवाहन हवामान शास्त्रज्ञांच्या वतीने करण्यात आले आहे.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख