अ‍ॅपशहर

विद्यार्थिनींशी लैंगिक चाळे, दोन शिक्षकांना अटक

शहरातील यवतमाळ पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनींशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवरून शहरात तणावाचे वातावरण असून आज, गुरुवारी शाळा, कॉलेजेस बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापनाने या दोन्ही शिक्षकांना बडतर्फ केले आहे.

Maharashtra Times 30 Jun 2016, 10:08 am
म. टा. प्रतिनिधी, यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम student abusing in yavatmal two teacher arrested
विद्यार्थिनींशी लैंगिक चाळे, दोन शिक्षकांना अटक

शहरातील यवतमाळ पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनींशी लैंगिक चाळे केल्याप्रकरणी दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. या घटनेवरून शहरात तणावाचे वातावरण असून आज, गुरुवारी शाळा, कॉलेजेस बंदचे आवाहन करण्यात आले आहे. शाळा व्यवस्थापनाने या दोन्ही शिक्षकांना बडतर्फ केले आहे.

चित्रकला शिक्षक अमोल अरुण क्षीरसागर व नृत्य शिक्षक यश बोरुंदिया, अशी त्यांची नावे आहेत. जेवण केल्यानंतर हात धुवायला गेलेल्या इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनींशी हे दोघे लैंगिक चाळे करीत असत. कुणालाही याविषयी न सांगण्याविषयी धमकावत असल्याने मुली घाबरून राहात होत्या. पण, यातील एका मुलीला त्रास सुरू झाल्याने डॉक्टरकडे नेण्यात आले आणि सदर प्रकार उघडकीस आला. संतप्त पालकांनी शाळेत धाव घेत शिक्षकांना आपल्या हवाली करण्याची मागणी केली. संस्थेचे सचिव शाळेत आले. त्यांनी व्यवस्थापन समितीची बैठक बोलवित पालकांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले. याविषयीची माहिती होताच उपविभागीय अधिकारी राहुल मदने, पोलिस निरीक्षक ढोले यांनी घटनास्थळी धाव घेतली. पालकांचा रौद्रावतार पाहताच पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. सायंकाळी दोघांवरही गुन्हे दाखल करीत अटक केली. ‘या प्रकरणाला कुणीही राजकीय रंग देऊ नये. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. पण, तत्पूर्ती चौकशी होणे आवश्यक आहे. दोन्ही शिक्षकांना निलंबित नव्हे तर बडतर्फ केले आहे,’ अशी माहिती प्राचार्य डॉ. जेकबदास यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज