अ‍ॅपशहर

वेगळ्या विदर्भासाठी दिल्लीत धरणे

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने येत्या ३१ मार्चला स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना धरणे आंदोलनात मार्गदर्शन करण्यासाठी बोलविण्यात आले आहे.

Maharashtra Times 28 Feb 2016, 1:44 am
वाशीमः विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने येत्या ३१ मार्चला स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत. तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना धरणे आंदोलनात मार्गदर्शन करण्यासाठी बोलविण्यात आले आहे. तसेच विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पंतप्रधानांना वेळ मागितला असल्याची माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत अॅड. वामनराव चटप यांनी दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम take delhi to separate vidarbha
वेगळ्या विदर्भासाठी दिल्लीत धरणे


अॅड. चटप म्हणाले, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे एक शिष्टमंडळ २८ मार्च ते २ एप्रिलदरम्यान दिल्ली येथे थांबून महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत स्वतंत्र राज्याची चर्चा करून निवेदन देणार आहेत. विदर्भातील दोन मुख्य नेत्यांनी भाजपाची केंद्रात सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ देऊ, असे ठोस आश्वासन दिले होते. त्यानंतर केंद्र व राज्य सरकारला दोन वर्षे झाली आहेत. आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे. ५ डिसेंबर २०१५ला समितीचे हजारो कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले असता त्यांनी टाळले. म्हणून या आंदोलनासाठी संपूर्ण विदर्भात जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज