अ‍ॅपशहर

Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा प्रकरणातूनच, अमरावती पोलिसांचा गौप्यस्फोट

Umesh Kolhe News: नुपूर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यामुळे उदयपूरमध्ये झालेल्या हत्याकांडानंतर आता अमरावती पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. याच हत्येच्या पाच दिवस आधी अमरावतीमध्ये मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jul 2022, 12:12 pm
अमरावती : उदयपूर हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं अशात आता अमरावतीमधील उमेश कोल्हे या हत्येबाबतही पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांचा गळा चिरुन २१ जूनला रात्री निर्घृण खून झाला. ही हत्या नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाली असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम umesh kolhe news


कोल्हे यांच्या खूनामागे नूपूर शर्मा प्रकरणाचा वाद आहे का? याबाबत सखोल चौकशी करण्यात आली. यानंतर हा खून नुपूर शर्मा प्रकरणातूनच झाला असल्याचा खुलासा अमरावती पोलिसांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी प्रसिद्धी पत्रक जाहीर करून तशी माहिती दिली आहे.

धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, २ मित्र सकाळी व्यायामाला जाताना...
या प्रकरणाच्या चौकशीसाठी शुक्रवारी (दि. १) सकाळी ‘एनआयए’चे (राष्ट्रीय तपास यंत्रणा) पथक शहरात दाखल झाले असून, त्यांनी प्रकरणाशी संबंधित चौकशी सुरू केली आहे. मात्र, स्थानिक पोलिसांनी हे पथक शहरात आल्याबाबत दुजोरा दिला नव्हता. सध्या उमेश कोल्हे खून प्रकरणाचा तपास शहर पोलिसांकडून सुरू होता, आज पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

भाजपच्या बैलगाडा शर्यतीत अचनाक उधळले बैल; VIDEO पाहून काळजाचा ठोका चुकेल
या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी चार ते पाच सदस्यांचा समावेश असलेल्या ‘एनआयए’च्या पथकाने सुरूवातीला कोतवाली पोलीस ठाण्यातून प्रकरणाबाबत चौकशी केली. नंतर घटनास्थळीसुद्धा पाहणी केली होती. तसेच शहर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचीसुद्धा झाडाझडती घेतली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

हेही पाहा - तब्ब्ल ६० वर्षानंतर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातील अजब प्रकार, PHOTOS पाहून थक्क व्हाल
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज