अ‍ॅपशहर

यशोमती ठाकूर यांनी घेतली दिपाली चव्हाण यांच्या कुटुंबीयांची भेट

व्याघ्र प्रकल्पात वन परिक्षेत्र अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण कर्तव्यदक्ष धाडसी महिला वनअधिकारी होत्या. त्यांचा आत्महत्येची घटना अतिशय दुर्दैवी आहे

Authored byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Apr 2021, 5:00 pm
अमरावती/ मेळघाटः व्याघ्र प्रकल्पात वन परिक्षेत्र अधिकारी या पदावर कार्यरत असलेल्या दीपाली चव्हाण कर्तव्यदक्ष धाडसी महिला वनअधिकारी होत्या. त्यांचा आत्महत्येची घटना अतिशय दुर्दैवी आहे, मन पिळवटून टाकणारी आहे. ही वेदना, दुःख व्यक्त करायला शब्दच नाही. कारण ते या सर्वांपलीकडचं आहे, अशा शब्दात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्यातीच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी आज ४ मार्च रोजी थेट मोरगाव इथं भेट देऊन त्यांनी चव्हाण कुटुंबियांची सांत्वना केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yashomati thakur


यावेळी दिपाली यांचे पती राजेश मोहिते यांनी विस्तृत घटनाक्रम उलगडला.वरिष्ठ त्यांचा कसा अमानवीय छळ करीत होते याची माहिती दिली, तर त्यांचा सासू यांनी दीपाली यांच्याबद्दल बोलतांना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दीपाली ही आमची सून नव्हेतर मुलगीच होती. असं सांगून त्या म्हणाल्या की अधिकारी असल्याचा तिला कधीच गर्व नसायचा.

त्या ३५ जणांची भुतबाधा उतरली; अंनिसच्या प्रयत्नांना यश

आपल्या कर्तव्यात कधीचं कसूर करीत नसे. पण वरिष्ठ असलेल्या शिवकुमार यांनी तिचा भयंकर छळ केला. याबात मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना सुद्धा याची माहिती दिली होती. पण त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळंच दीपालीनं मृत्यूला कवटाळलं, असा आरोप करून दोषी असलेल्या शिकुमार यांना फाशीच झाली पाहिजे अशी तीव्र भावना त्यांनी व्यक्त केली.

दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण: श्रीनिवास रेड्डी यांचा जामीन कोर्टाने फेटाळला

या प्रसंगी पालकमंत्री यशोमती ठाकुर म्हणाल्या की, दीपाली यांची आत्महत्या ही घटनाच वेदनादायी आहे. जितक दुःख तुम्हाला झालंय तितकंच दुःख आम्हाला झालंय दीपाली यांचा मृत्यूनं एक धाडसी, कर्तव्यदक्ष अधिकारी गमावला आहे. जे दोषी असतील त्यांना माफी नाही अस त्या यावेळी म्हणाल्या.

वनकर्मचाऱ्यांचे आरोग्य व सुरक्षा वाऱ्यावर

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज