अ‍ॅपशहर

म्हणे, यवतमाळ जिल्ह्यात पीक उत्तम!

महसूल प्रशासनाने यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्याची नजर पीक आणेवारी ६६ टक्के घोषित केली होती. पावसाच्या अनियमितपणामुळे जिल्हाभरात सोयाबीन, कापूस या महत्त्वाच्या पिकांची अवस्था खराब असताना पीक आणेवारी अतिशय चांगली दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला होता. पुन्हा सुधारित आणेवारी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष पिकांच्या वस्तुस्थितीवर आधारित आणेवारी जाहीर होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, जिल्हा महसूल प्रशासनाने सुधारित पीक आणेवारी ६३ टक्के घोषित केल्याने त्यांची अपेक्षा फोल ठरली आहे.

Maharashtra Times 6 Dec 2016, 4:00 am
म.टा. प्रतिनिधी, यवतमाळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम yeotmal falce anewari of crop by revenue department
म्हणे, यवतमाळ जिल्ह्यात पीक उत्तम!

महसूल प्रशासनाने यापूर्वी ३० सप्टेंबर रोजी जिल्ह्याची नजर पीक आणेवारी ६६ टक्के घोषित केली होती. पावसाच्या अनियमितपणामुळे जिल्हाभरात सोयाबीन, कापूस या महत्त्वाच्या पिकांची अवस्था खराब असताना पीक आणेवारी अतिशय चांगली दाखविण्यात आल्याने शेतकऱ्यांत असंतोष पसरला होता. पुन्हा सुधारित आणेवारी जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष पिकांच्या वस्तुस्थितीवर आधारित आणेवारी जाहीर होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, जिल्हा महसूल प्रशासनाने सुधारित पीक आणेवारी ६३ टक्के घोषित केल्याने त्यांची अपेक्षा फोल ठरली आहे.

यानंतर अंतिम पीक आणेवारी ३१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. या आणेवारीनुसार बँका शेतकऱ्यांकडील कर्जाच्या वसुलीची तयारीही करू शकतात. जिल्ह्यात १६ तालुके असून २ हजार ५३ गावे आहेत. मात्र, आणेवारी जाहीर करताना महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांचा विचारच केला नसल्याचे दिसून येत आहे. यावर्षी सुरुवातीला पाऊस झाला नाही. त्यानंतर थोडा पाऊस होताच शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाने दगा दिला. त्यामुळे सोयाबीनचे पीक गेले. दरम्यान अतिपाऊस झाल्याने कापसावर त्याचा परिणाम होऊनही जिल्ह्यातील पिकांची स्थिती उत्तम कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज