अ‍ॅपशहर

आरोग्य शिबिरात १७० जणांची तपासणी

म टा...

Maharashtra Times 16 Jun 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, वैजापूर

जनसामान्यांना मोफत आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने शहरातील प्रभाग क्रमांक ११मध्ये रमजान ईद व महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त भारतीय जनता पक्ष, औरंगाबाद येथील जे. जे. प्लस हॉस्पिटल, नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटल व इंडिया हेल्थलाइनतर्फे शुक्रवारी सर्व रोग तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिरात १७० जणांची नेत्र, हृदय रोग, मधुमेह, हिमोग्लोबीन व रक्तदाब तपासणी करण्यात आली. तसेच रुग्णांना औषधे सुचवण्यात आले. वैजापूर विकास मंचचे अध्यक्ष जे. के.जाधव, नगराध्यक्षा शिल्पा परदेशी, जे. जे. प्लस हॉस्पिटलचे डॉ. जीवन राजपूत यांनी शिबिराचे उद्घाटन केले. प्रास्ताविक धोंडिरामसिंह राजपूत यांनी केले. आयोजक दिनेश राजपूत, राजेश गायकवाड, दशरथ बनकर, नगरसेविका जयश्री राजपूत, संगीता गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज