अ‍ॅपशहर

धक्कादायक ! 'त्या' दोन बिबट्यांवर विषप्रयोगाचा संशय; वन विभागाने तिघांना घेतलं ताब्यात

सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारातील दोन बिबट्यांचा एकापाठोपाठ मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र बिबट्यांचा मृत्यू विषप्रयोगातून झाल्याचे उघडकीस येताच वनविभागाने धडक कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले. दोन्ही बिबट्यांना मृत शेळ्यांवर विषप्रयोग करून मारल्याचा संशय वन विभागाला आहे.

Authored byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Feb 2022, 11:51 am
औरंगाबाद: सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारातील दोन बिबट्यांचा एकापाठोपाठ मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र बिबट्यांचा मृत्यू विषप्रयोगातून झाल्याचे उघडकीस येताच वनविभागाने धडक कारवाई करत तीन संशयितांना ताब्यात घेतले. दोन्ही बिबट्यांना मृत शेळ्यांवर विषप्रयोग करून मारल्याचा संशय वन विभागाला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम leopard


जरंडी शिवारात २३ फेब्रुवारीला पाच वर्षीय नर बिबट्या अत्यवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर वन विभागाकडून तात्काळ वैद्यकीय पथकाला बोलवण्यात आले. मात्र तोपर्यंत या बिबट्याने प्राण सोडले होते. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी २४ फेब्रुवारीला पुन्हा एकदा मादी बिबट्या अत्यवस्थेत आढळून आली. पशुवैद्यकीय पथकाकडून तिच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वाचाः शेतकरी आंदोलनाचा भडका; संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणचे कार्यालय पेटवले

या दोन्ही बिबट्यांचा मृत्यू वन विभागाला सुरुवातीपासून संशयित वाटत होता. त्यामुळे बिबट्याच्या मृत्यूनंतर वनविभागाने दहा कर्मचाऱ्यांच्या पथकाला तपासासाठी २४ तास तैनात करत घटनास्थळाची पाहणी करण्याचे आदेश दिले. यात घटनास्थळालगत एका ठिकाणी मृत शेळीचा सांगाडा आढळून आला. यात विषप्रयोगाचा अंदाज बळावल्याने त्याचा धागा पकडत वन विभागाने तीन संशयितांना अटक केली आहे. त्यामुळे पुढील चौकशीतून या प्रकरणाचे गूढ उकलणार असल्याचे बोलले जात आहे.

वाचाः आयकर विभागाचे पथक यशवंत जाधवांच्या घरून परतले; ७२ तासांची चौकशीत हाती काय लागलं?
लेखकाबद्दल
मानसी क्षीरसागर
मानसी क्षीरसागर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सिनीअर डिजीटल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत | डिजीटल पत्रकारितेचा सहा वर्षांचा अनुभव आहे | सामाजिक, राजकीय, मनोरंजन याबरोबरच माहितीविषयक आणि विश्लेषणात्मक बातम्यांचे कव्हरेज करण्याची विशेष आवड... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज