अ‍ॅपशहर

केके ग्रुपच्या शिबिरात ३७५ दात्यांचे रक्तदान

म टा प्रतिनिधी, औरंगाबादके के ग्रुपच्या वतीने रविवारी (१५ जुलै) भडकल गेट परिसरात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३७५ दात्यांनी रक्तदान केले...

Maharashtra Times 16 Jul 2018, 4:00 am

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

के. के. ग्रुपच्या वतीने रविवारी (१५ जुलै) भडकल गेट परिसरात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ३७५ दात्यांनी रक्तदान केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) रक्ताच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हे शिबिर घेण्यात आल्याचे ग्रुपच्या वतीने सांगण्यात आले. विभागीय रक्तपेढीच्या वतीने रक्तसंकलन करण्यात आले. यानिमित्ताने घाटीच्या अभ्यागत समितीचे अध्यक्ष आमदार अतुल सावे, आमदार इम्तियाज जलील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी शिबिराला भेट दिली. शिबिरासाठी ग्रुपचे अखिल अहमद उर्फ हाफीज व त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेतला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज