अ‍ॅपशहर

काल हकालपट्टी, आज सामूहिक राजीनामे; औरंगाबादच्या मनसेतील धुसफूस सुरूच

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांच्या दौऱ्यानंतर औरंगाबाद शहरातील मनसेतील धुसफूस आणि नाराजी नाट्य पुन्हा एकदा समोर आले होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Dec 2021, 6:12 pm
औरंगाबादः जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये (MNS Raj Thackeray) सुरू असलेली धुसफूस आणि नाराजी नाट्य काही संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी मनसेच्या चार पदाधिकऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. तर आज त्याच हकालपट्टीला उत्तर देतांना ५७ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. (Aurangabad MNS)
महाराष्ट्र टाइम्स.कॉम raj-thackeray


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद दौरा केला होता. या दौर्‍यात त्यांनी मनसेचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांचा पद काढून घेतले होते. त्यांनतर नाराज दाशरथे समर्थकांनी सोशल मीडियावरून आपली नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पक्षाची सोशल मीडियावर बदनामी करण्याचे कारण देत मंगळवारी चार पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे या नाराज पदाधिकारी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

वाचाः धरण उशाला, कोरड घशाला; तेरणेचं पाणी मुरतंय कुठं? ३७.९३ कोटी खर्चूनही.....

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना हकालपट्टी झालेल्या पदाधिकऱ्यांना आरोप केला आहे की, स्थानिक पदाधिकारी यांनी मंगळवारी काढलेलं पत्रक म्हणजे अत्यंत अपमानकारक आणि दबाव तंत्राचा वापर करून महाराष्ट्र सैनिकांना बदनाम करण्याची कट-कारस्थान आहे. त्यामुळे आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक नवयुक्त पदाधिकार्‍यांच्या कपटी आणि दुजाभाव करणाऱ्या वृत्तीला कंटाळून सामूहिक राजीनामे देत असल्याची माहिती दिली.

वाचाः भरधाव बसने पाच वर्षांच्या मुलाला चिरडले; नागपुरातील घटना

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज