अ‍ॅपशहर

आई-बापाने पोरीला शिकवण्यासाठी सायकल घेऊन दिली, मात्र वाटेत अनर्थ घडला; जागीच मृत्यू

Accident In Aurangabad Today : बहिरगाव-डोणगाव रस्त्यावर मुरूम वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने श्रद्धाला चाकाखाली चिरडले. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.

| Edited byअक्षय शितोळे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2022, 11:09 am
औरंगाबाद : शाळा सुटल्यावर सायकलवरून घरी निघालेल्या ७ वी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टरने चिरडले. या भीषण अपघातात विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना कन्नड तालुक्यातील बहिरगाव-डोणगाव रस्त्यावर घडली. श्रद्धा सोमनाथ पिंपळे (वय-१३, रा. डोणगाववस्ती, कन्नड) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad girl accident 1
औरंगाबाद अपघात


या प्रकरणी अधिक माहिती अशी की, श्रद्धा पिंपळे ही बनशेंद्रा येथील शाळेत ७ वीच्या वर्गात शिकत होती. गावापासून शाळा दूर असल्याने कुटुंबियांनी तिला सायकल घेऊन दिली होती. त्यावरुनच श्रद्धा रोज शाळेत ये-जा करत असत. शुक्रवारी शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे श्रद्धा सायकलने घरी जात होती. दरम्यान बहिरगाव-डोणगाव रस्त्यावर मुरूम वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने श्रद्धाला चाकाखाली चिरडले. या भीषण अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.

शिक्षक शिकवत असताना अचानक बेशुद्ध पडला; दुसरीत शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा वर्गातच मृत्यू

घटनेची माहिती प्राप्त होताच कन्नड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रॅक्टर चालकास तब्यात घेऊन श्रद्धाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात हलवला. मात्र संतप्त नातेवाईकांनी मृतदेह घेण्यास नकार दिल्याने रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता. अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढली.

शिंदे गट विरुद्ध मनसे-भाजप सामना?; ट्विट वॉर रंगले, 'लोढाचे कमिशन, जागांचे व्यवहार...'

दरम्यान, याप्रकरणी कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज