अ‍ॅपशहर

मोबाइल न दिल्याच्या रागातून हत्या

रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणाला मोबाईल मागितल्यानंतर तरुणाने नकार देत अपमान केल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याच्या प्रकरणातील आरोपी सचिन मधुकर पवार याला रविवारी (८ डिसेंबर) न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला रविवारपर्यंत (१५ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी दिले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Dec 2019, 10:18 pm
औरंगाबाद: रस्त्यावरुन जाणाऱ्या तरुणाला मोबाईल मागितल्यानंतर तरुणाने नकार देत अपमान केल्याच्या रागातून डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याच्या प्रकरणातील आरोपी सचिन मधुकर पवार याला रविवारी (८ डिसेंबर) न्यायालयात हजर करण्यात आले असता, आरोपीला रविवारपर्यंत (१५ डिसेंबर) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. पी. पांडव यांनी दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime


बजाजनगर भागात मद्यप्राशन केल्यानंतर शुक्रवारी (६ डिसेंबर) रात्री आरोपी सचिन मधुकर पवार (२२, रा. बकवालनगर, वाळूज एमआयडीसी) हा एका मित्रासोबत वळदगाव परिसरात आला. त्यानंतर फोन करायचा असल्यामुळे सचिनने रस्त्यावरुन जाणाऱ्या एका (मृत) अनोळ‌खी तरुणाला मोबाईल मागितला. मात्र तरुणाने त्याला मोबाईल न देता धक्का देत शिविगाळ केली. त्या रागातून सचिन पवार याने तरुणाच्या तोंडावर जोरात बुक्की मारली. त्यानंतर त्याला खाली पाडून भला मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात दोनवेळा घातला. यात त्या अनोळखी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकारानंतर सचिन पवार व त्याचा मित्र दोघेही तेथून पसार झाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज