अ‍ॅपशहर

अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड

सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांबाबत झालेल्या तक्रारींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यापुढे जात औरंगाबाद व जालन्यातील अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Times 26 Apr 2017, 3:00 am
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागातील कामांबाबत झालेल्या तक्रारींची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यापुढे जात औरंगाबाद व जालन्यातील अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम action aginst pwd officers
अनेक अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड

पीडब्ल्यूडीअंतर्गत रस्ते, पूल, सरकारी इमारतींच्या बांधकामांची कामे केली जातात. या कामांमध्ये अनेक वेळा तक्रारी होतात. निविदेत मान्य केल्याप्रमाणे काम प्रमाणित नसणे, इंजिनीअरकडून डोळेझाक होणे अशा अनेक तक्रारी पीडब्ल्यूडीकडे प्राप्त झाल्या होत्या. एक, दीड वर्षांपासून या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी प्रक्रिया मंदावली होती. पण गेल्या महिन्यापासून चौकशीचा वेग वाढला आहे. गेल्या आठवड्यात औरंगाबाद व गंगापूर तालुक्यातील दोन कामांच्या तक्रारीनंतर झालेल्या चौकशीत दोषी आढळल्यामुळे दोन उपअभियंत्यांना अधीक्षक अभियंता ए. बी. सूर्यवंशी यांनी निलंबित केले. तक्रारींचा निपटारा करण्यासाठी अनेक प्रकरणांची चौकशी सुरू झाली आहे. दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज