अ‍ॅपशहर

अक्षयतृतीयेला आंबे महागले

अक्षयतृतीया म्हटले की आंबे आलेच, पण यंदा या साडेतीनपैकी एक मुहूर्ताच्या पूर्वसंध्येला मंगळवारी बाजारात आंब्याचे दर शंभर रुपयांपासून ३५० रुपये किलोपर्यंत होते. यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला.

Maharashtra Times 18 Apr 2018, 5:51 am
औरंगाबाद : अक्षयतृतीया म्हटले की आंबे आलेच, पण यंदा या साडेतीनपैकी एक मुहूर्ताच्या पूर्वसंध्येला मंगळवारी बाजारात आंब्याचे दर शंभर रुपयांपासून ३५० रुपये किलोपर्यंत होते. यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mango


हापूसच्या आंब्याचा दर सुमारे ७०० ते ८०० रुपये डझन होता. याशिवाय केशर, बदाम, तोतापुरी आणि हैदराबादी लाल आंब्याच्या दर सुमारे २५० ते २७० रुपये किलो होते, असे औरंगपुरा येथील युसूफ बागवान यांनी सांगितले. दरम्यान गेल्या आठ दिवसांपासून आंब्याचे दर वाढलेलेच होते. कृषीउत्पन्न बाजार समितीत आंब्यांचे आवक २२० क्विंटल पर्यंत झाली. शहराचा आवाका, अक्षयतृतीयेचा सण पाहता ही झालेली आवक शहराला पुरेशी नाही, यामुळे आंब्यांचे दर वाढले असल्याचे सिडकोतील व्यापारी जनार्दन जाधव यांनी सांगितले. दरम्यान आंब्याची आवक घटल्याने दर वाढले. त्यामुळे अनेकांनी अक्षयतृतीया सणाला आंब्यांची खरेदी केली नसल्याने गृहिणी नाराज होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज