अ‍ॅपशहर

एमआयएम स्वबळावर; आणखी चार उमेदवारांची घोषणा

आधी वंचित बहुजन आघाडीसोबत फारकत घेतल्यानंतर पुन्हा वंचितबरोबर जाण्याचे संकेत देणाऱ्या एमआयएमने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची घोषणा करत स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केले आहे. एमआयएमने आज आणखी चार उमेदवारांची नावं घोषित केल्याने एमआयएम-वंचित आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2019, 8:16 pm
औरंगाबाद: आधी वंचित बहुजन आघाडीसोबत फारकत घेतल्यानंतर पुन्हा वंचितबरोबर जाण्याचे संकेत देणाऱ्या एमआयएमने विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची घोषणा करत स्वबळावर लढणार असल्याचे घोषित केले आहे. एमआयएमने आज आणखी चार उमेदवारांची नावं घोषित केल्याने एमआयएम-वंचित आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम imtiaz-jaleel


एमआयएमने आज सांगोला (सोलापूर) मतदारसंघातून शंकर भगवान सरगर, सोलापूर मध्यमधून फारुख मकबूल शाब्दी, सोलापूर दक्षिणमधून सुफिया तौफिक शेख आणि पुणे छावणीमधून हिना शफीक मोमीन यांची उमेदवारी घोषित केली आहे. एमआयएमने यापूर्वी तीन उमेदवारांची घोषणा केली होती. आतापर्यंत एमआयएमने सात जागांवर त्यांचे उमेदवार घोषित केले आहेत. त्यामुळे एमआयएम-वंचित यांची आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या परवानगीनेच ही यादी जाहीर करत असल्याचं पत्रकात म्हटलं आहे. पत्रकाखाली एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष, खासदार इम्तियाज जलील यांची स्वाक्षरी आहे. आतापर्यंत एमआयएमने सात उमेदवार जाहीर केल्याचं पत्रकात म्हटलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज