अ‍ॅपशहर

‘वंचित’सोबत काडीमोड; ओवेसींचे शिक्कामोर्तब

अखेर असदुद्दीन ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्या भूमिकेची री ओढून तीच पक्षाची भूमिका असल्याचे स्पष्ट केल्याने वंचित आघाडीतून 'एमआयएम'च्या बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे विधानसभेच्या ७४ जागा लढवू, अशी घोषणा मंगळवारी 'एमआयएम' प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली.

Maharashtra Times 11 Sep 2019, 1:28 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम owesi


अखेर असदुद्दीन ओवेसी यांनी इम्तियाज जलील यांच्या भूमिकेची री ओढून तीच पक्षाची भूमिका असल्याचे स्पष्ट केल्याने वंचित आघाडीतून 'एमआयएम'च्या बाहेर पडण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे विधानसभेच्या ७४ जागा लढवू, अशी घोषणा मंगळवारी 'एमआयएम' प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी केली.

खासदार जलील यांनी ओवेसींनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यात म्हणाले, 'वंचित बहुजन आघाडीसोबत"एमआयएम'ची आघाडी व्हावी. अशी सर्वांची इच्छा होती. मात्र, तसे झालेले नाही. ही आघाडी कायम राहावी. यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र त्याचा उपयोग झालेला नाही. 'एमआयएम'ने स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आमच्या सोबत दलित, मराठा आणि ओबीसीसह अन्य जातीधर्माचे लोक येण्यासाठी इच्छुक आहेत. निश्चितच आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात 'एमआयएम'ची ताकद वाढलेली दिसेल', असा दावा केला. 'कोणत्याही समाजाचे मते त्या पक्षाकडे असतात, असे कोणीही समजू नये. मिळणारा प्रतिसाद पाहता 'एमआयएम' एक सशक्त पक्ष म्हणून समोर येईल. सध्या वंचित बहुजन आघाडीला दिलेल्या प्रस्तावाप्रमाणे ७४ मतदार संघावर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आकडा कमी किंवा जास्त होऊ शकतो. ज्या ठिकाणी प्रभावी उमेदवार मिळाला तर त्या ठिकाणीही एमआयएम आपला उमेदवार देऊ शकतो', असे संकेतही जलील यांनी दिले.

आंबेडकरांनी ओवेसींशी चर्चा करावी

'२८८पैकी 'एमआयएम' सध्या फक्त ७४ जागेचा विचार करित आहे. उमेदवार नसलेल्या मतदार संघात 'एमआयएम'च्या युनिटने वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करावा. यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी थेट पक्ष प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा', अशी ऑफर जलील यांनी अॅड. आंबेडकरांना दिली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज