अ‍ॅपशहर

पाच लाखांची मदत विद्यापीठाकडे सुपूर्द

मराठवाड्यातील भीषण दुष्काळाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी बारामती अॅग्रोतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पाच लाख रुपये मदत देण्यात आली आहे. ही रक्कम पाचशे गरजू मुलांच्या २०१६-१७ मधील मोफत निवासावर खर्च करण्यात येणार आहे.

Maharashtra Times 4 Apr 2016, 3:00 am
कन्नड : मराठवाड्यातील भीषण दुष्काळाचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये, यासाठी बारामती अॅग्रोतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पाच लाख रुपये मदत देण्यात आली आहे. ही रक्कम पाचशे गरजू मुलांच्या २०१६-१७ मधील मोफत निवासावर खर्च करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra/aurangabad
पाच लाखांची मदत विद्यापीठाकडे सुपूर्द

दुष्काळामुळे मराठवाड्यात भीषण पाणी टंचाई असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. या बाबींचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होवू नये व होतकरू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, असा बारामती अॅग्रोचा ही मदत देण्यामागे उद्देश आहे. बारामती अग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित पवार यांच्या हस्ते विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्याकडे पाच लाख रुपयांचा डीडी शनिवारी सुपूर्द करण्यात आला. यावेळी कुलसचिव एम. ए. लोखंडे, डॉ. सुहास गोराळे, डॉ. दिलीप खैरनार, कार्यकारी संचालक सुभाष गुळवे, संजय सस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज