म. टा. प्रतिनिधी, सिल्लोड
येथे शुक्रवारी निघणाऱ्या मुस्लिम मूक मोर्चाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मोर्चात सहभागी होण्यासाठी प्रत्येक गाव व शहरात कॉर्नर बैठका घेण्यात आल्या. या बैठकीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
मुस्लिम समाजाला नोकरी व शिक्षणात पाच टक्के आरक्षण द्यावे, शरीयत कायद्यात हस्तक्षेप करू नये, विविध आयोगांच्या शिफारसी लागू कराव्यात या मागण्यांसाठी हा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मुस्लिम समाजाच्या उज्वल भविष्यासाठी मुस्लिमांना आज आरक्षणाची गरज असल्याचे या कॉर्नर बैठकांमध्ये सांगितले जात आहे. सर्व समाज बांधवांनी मोर्चात उपस्थित राहावे, कोणीही घरी राहणार नाही याची दक्षता घ्यावा, असे आवाहन कोअर कमिटीतर्फ करण्यात येत आहे. यासाठी मुस्लिम समाजातील धर्मगुरू, ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित नागरिक व राजकीय नेते बैठका घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.