अ‍ॅपशहर

​ संतप्त शेतकऱ्यांची बँकेवर दगडफेक

पीकविमा भरण्याची मुदत संपत असल्यामुळे विमा भरण्यासाठी बँकांमध्ये शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याने यंत्रणा कोलमडून पडली. त्यामुळे संयम तुटलेल्या शेतकऱ्यांनी जिंतूर तालुक्यातील बोरी येथे रास्तारोको आंदोलन केल्यनंतर मध्यवर्ती बँकेवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

Maharashtra Times 28 Jul 2017, 3:58 am
परभणी : पीकविमा भरण्याची मुदत संपत असल्यामुळे विमा भरण्यासाठी बँकांमध्ये शेतकऱ्यांनी एकच गर्दी केल्याने यंत्रणा कोलमडून पडली. त्यामुळे संयम तुटलेल्या शेतकऱ्यांनी जिंतूर तालुक्यातील बोरी येथे रास्तारोको आंदोलन केल्यनंतर मध्यवर्ती बँकेवर जोरदार दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम angry farmers pelted the bank
​ संतप्त शेतकऱ्यांची बँकेवर दगडफेक

जिंतूर महार्गावरील बोरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत गुरुवारी शेतकऱ्यांची सकाळपासूनच पीकविमा भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वाढलेली गर्दी आणि तांत्रिक अडचणींमुळे विमा भरून घेण्यात अडचण येत होती. यामुळे शेतकऱ्यांनी दुपारी १ वाजता सुरू केलेले रास्ता रोको आंदोलन ३ वाजेपर्यंत चालले. हे आंदोलन पोलिसांच्या मध्यस्थीत शेतकरी आणि बँक अधिकारी यांची चर्चा झाल्यानंतर मागे घेण्यात आले. यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शटर उघडताच एकच गोंधळ उडाला. त्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी दगडफेक करण्यास सुरूवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी लाठीमार केला. यावेळी काही काळ गेंधळ आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परभणीहून दंगा नियंत्रण पथक आल्यानंतर आंदोलक पांगले. उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कांबळे फौजफाट्यासह बोरीत ठाण मांडून आहेत. दरम्यान, पीक विमा भरण्याची मुदत वाढविण्याची प्रक्रिया शासनस्तरावरून सुरू आहेत. मध्यवर्ती बँकेकडूनही जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा विमा भरून घेण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा ऊभी करण्याचे प्रयत्न असल्याची माहिती बँकेचे मुख्य व्यवस्थापक व्ही. जी. जाधव यांनी दिली .

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज