अ‍ॅपशहर

उद्धव ठाकरे दाढीवाल्यांना घाबरतात; ओवेसींचा घणाघात

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार तोफ डागली. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मला घाबरतात. कारण आम्ही दोघेही दाढीवाले आहोत, अशी टीका ओवेसी यांनी आज केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Oct 2019, 8:03 pm
औरंगाबाद: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार तोफ डागली. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मला घाबरतात. कारण आम्ही दोघेही दाढीवाले आहोत, अशी टीका ओवेसी यांनी आज केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम owaisi-uddhav


औरंगाबादेत एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांची सभा पार पडली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली. उद्धव ठाकरे यांना नैराश्याने घेरलं आहे. हीच त्यांची अडचण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत हुशार आणि चाणाक्ष आहेत. उद्धव ठाकरेंना फडणवीस यांना मात देता येत नाही. फडणवीस त्यांना प्रत्येक गोष्टीत गाफील ठेवतात. त्यामुळेच उद्धव यांना नैराश्य आले आहे. त्यामुळे ते आमच्यावर टीका करत आहेत. त्यांचा राग रास्तच आहे. पण ते चुकीच्या ठिकाणी राग काढत आहेत, असा टोला ओवेसी यांनी लगावला. उद्धव यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडेही काही चालत नाही. ते मोदींना घाबरतात. कारण मोदींना दाढी आहे. ते मलाही दाढी आहे. मलाही ते घाबरतात. त्यामुळेच त्यांचं आकांडतांडव सुरू आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

तत्पूर्वी सभे दरम्यान ओवेसी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. 'देशात लोकशाही असूनही दलित-मुस्लिमांचा आवाज दाबला जात आहे. राखीव मतदारसंघातून उमेदवार निवडून येतात पण, ते शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्याकडून निवडून येतात आणि विधानसभेत तोंड उघडत नाहीत. भीमा कोरेगाव घडल्यानंतर कोण बोलले? सरकारने तरुणांना तुरुंगात डांबले. ७० वर्षांपूर्वीची स्थिती २०१९मध्येही कायम आहे. संसदेतही राखीव मतदारसंघातील लोकप्रतिनिधी फक्त जांभई देण्यासाठीच तोंड उघडतात, अशी टीका त्यांनी केली.

औरंगाबादला चार दिवसातून एकदा पाणी येते. दलित-मुस्लिम वस्त्यात पाणी, वीज, रस्ते नाही. गरीबासाठी काही तरी खर्च करा. अमेरिकेत 'हाउडी मोदी' करून देशाला काय मिळाले? एकही नवीन उद्योग, व्यापार देशात आला नाही, अशी टीकाही त्यांनी केली. दहशतवादाच्या नावावर आता एक लिस्ट जारी करण्यात येणार आहे. त्यात ज्याचं नाव लिहिलेलं असेल त्याला दहशतवादी घोषित करण्यात येईल. त्याची जिंदगी बर्बाद होईल. दहशतवादी म्हणून घोषित झालेली व्यक्ती कोर्टातही दाद मागू शकत नाही. कोर्टात गेला तरी त्याला कोर्ट त्याला दहशतवादी घोषित करेल. अशा प्रकारचा कायदा आणला गेला आणि काँग्रेसने या कायद्याला पाठिंबा दिला, असं त्यांनी सांगितलं.

प्रचाराच्या तोफा थंडावल्या; मोर्चेबांधणी, जोरबैठकांवर भर

महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण २८८ जागांसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून त्यासाठी ८ कोटी ९५ लाख ६२ हजार ७०६ मतदारांची नोंदणी झाली आहे. महाराष्ट्रात एकूण ९५,४७३ मतदान केंद्रं असून १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.

भाजपचे राजकारण द्वेषाचेः खा. ओवेसी

काँग्रेस कमकुवत झाल्यानेच भाजपला यश: ओवेसी

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज