अ‍ॅपशहर

प्रेमविवाह केलेल्या मारण्याचा प्रयत्न

प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणास मारहाण करून विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. चिकलठाणा औद्योगिक परिसरात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सात जणांनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिली.

Maharashtra Times 16 Feb 2017, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम maharashtra/aurangabad/aurangaad
प्रेमविवाह केलेल्या मारण्याचा प्रयत्न

प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून एका तरुणास मारहाण करून विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न केला. चिकलठाणा औद्योगिक परिसरात सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सात जणांनाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, अशी माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिली.
विकास गंगाधर सोनवणे (वय २५, रा. ब्रिजवाडी), असे फिर्यादीचे नाव आहे. विकास हे दुचाकीने घराकडे जात होते. त्यावेळी वोडाफोन कॉल सेंटरजवळ विश्वंभर भालेराव, संतोष शिंदे व त्यांच्या साथीदारांनी विकासला अडवले. आमच्या भावाच्या मुलीसोबत प्रेमविवाह का केला, असे म्हणत भालेराव व संतोष, त्यांच्या साथीदारांनी शिवीगाळ करत मारहाण केली, तसेच विषारी औषध बळजबरीने पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, अशी तक्रार आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज