अ‍ॅपशहर

मुख्यमंत्र्यांवर भारताचा अपमान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल कराः वकीलाची मागणी

करोनाच्या संकटातही शिवसेनेने दसरा मेळाव्याच्या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. दसरा मेळाव्यातील भाषणात मुख्यमंत्र्यांनी भाजपचा समाचार घेतला होता.

Authored byटीम मटा ऑनलाइन | Edited byमानसी क्षीरसागर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Oct 2020, 9:23 am
औरंगाबाद: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भारताचा अपमान केल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज पोलिस आयुक्तांकडे एका वकीलाकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम uddhav thackeray


शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी तडाखेबंद भाषण केलं होतं. या भाषणात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर तोफ डागली होती. तसंच, बिहार निवडणुक, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या, कंगना राणावत या मुद्द्यावरही भाष्य केलं होतं. यावरूनच औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

सरकारच्या वकिलांमध्ये समन्वय नाही; मराठा आरक्षणावरून भाजप आक्रमक

अॅड. रत्नाकर चौरे असं या वकीलाचं नाव आहे. मुख्यमंत्र्यांनी दसरा मेळाव्यात भारत देशाची तुलना पाकिस्तान आणि बांग्लादेश सारख्या दहशतवादी आणि मुस्लिम राष्ट्राशी करून भारताचा अपमान केला आहे. तसंच हिंदुत्वाचा त्याग करून त्यांनी राज्याची सत्ता संपादन करून राष्ट्रीय व धार्मिक भावना दु:खविल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी पोलिस आयुक्तांकडे दिलेल्या तक्रारीत केली आहे.

'दसरा मेळाव्यातील भाषण म्हणजे शिमग्याचं भाषण'

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

बिहार विधानसभा निवडणुकीत सरकार आल्यावर मोफत कोरोना लस देण्याची घोषणा भाजपने केली आहे. यावर बिहारमध्ये लस मोफत मग उर्वरित भारत काय बांग्लादेश की पाकिस्तानात आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला होता. तसंच, कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. त्याचाही मुख्यमंत्र्यांनी समाचार घेतला होता. पाकव्याप्त काश्मीर भारतात घेऊ असे पंतप्रधान नरेंद्र मोदीच म्हणतात. पण प्रत्यक्षात आपल्या ताब्यात जे काश्मीर आहे तेथील जमिनीचा साधा तुकडाही आपण घेऊ शकत नाही, अशी आजची स्थिती आहे. हे सगळे असताना आपल्याच देशातील एखाद्या भागाला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हा एकप्रकारे पंतप्रधान मोदींचाच अपमान आहे, असं ते म्हणाले होते.

अजित पवारांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याला करोनाची लागण

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज