अ‍ॅपशहर

शहीद संदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार

पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले संदीप जाधव यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळगावी केळगावात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जाधव यांच्या मुलाचा आज पहिला वाढदिवस होता. त्याच दिवशी मुलाला वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यामुळं संपूर्ण देश हळहळला.

Maharashtra Times 24 Jun 2017, 2:37 pm
मटा ऑनलाइन वृत्त । औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad martyr sandeep jadhav cremated in kelgaon today
शहीद संदीप जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार


पाकिस्तानच्या हल्ल्यात शहीद झालेले संदीप जाधव यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळगावी केळगावात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जाधव यांच्या मुलाचा आज पहिला वाढदिवस होता. त्याच दिवशी मुलाला वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्यामुळं संपूर्ण देश हळहळला.

संदीप जाधव यांचं पार्थिव शुक्रवारी औरंगाबादमध्ये आणण्यात आलं होतं. रात्री त्यांचं पार्थिव मिलिटरी हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आलं होतं. आज सकाळी ते केळगावात आणण्यात आलं. तेव्हा जाधव कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला. या वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. अश्रूभरल्या डोळ्यांनी लोक ‘संदीप जाधव अमर रहे’ अशा घोषणा देत होते. Maharashtra: Last rites of Army jawan Sandeep Jadhav (who lost his life in attack by Pak's BAT) underway at his village in Aurangabad. pic.twitter.com/8c4eS0d68y — ANI (@ANI_news) June 24, 2017

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज