अ‍ॅपशहर

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या ठिकाणी खोदकामात असं काही सापडलं की, पोलीस चक्रावले!

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि पोलिसांकडून संयुक्त पंचनामा सुरू आहे.

Maharashtra Times 21 Dec 2021, 9:55 am
औरंगाबाद : औरंगाबाद येथील प्रियदर्शनी उद्यानात सुरू असलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या संरक्षण भीतीजवळ ऐतिहासिक दोनशे ते अडीचशे वर्षांपूर्वीचे नाणी सापडल्याने खळबळ उडाली आहे. तर घटनास्थळी पोलीससुद्धा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad news 1


गेल्या काही दिवसांपासून प्रियदर्शनी उद्यानात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम चालू आहे. तर स्मारकाच्या संरक्षण भिंतीसाठी खोदकाम चालू असताना याठिकाणी ही नाणी सापडली आहे. प्रत्येक नाण्यावर वेगवेगळ्या दशकाची नावे आहेत. सन १६८०, १८५४ आणि १८८१ असे लिहिले आहे. जवळपास २ किलोग्राम वजनाची ही नाणी आहे. प्रथमदर्शनी तरी ही नाणी तांब्याची असल्याचे बोलले जात आहे.

जेवणानंतर शतपावली करणाऱ्या सख्ख्या बहिणींनी एकत्रच गमावले प्राण, काळजाचा ठोका चुकावणारी घटना

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या कामात सापडली एतिहासिक नाणी


जेसीबीने गड्ड्याचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर मजुराला त्यातील माती काढता वेळेस टोपल्यांमध्ये ही नाणी सापडली आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका आणि पोलिसांकडून संयुक्त पंचनामा सुरू आहे.

महत्वाचे लेख