अ‍ॅपशहर

ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे पालिकेचा मोठा निर्णय, आता विनामास्क गाडी चालवली तर...

राज्यभरातील ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांची परिस्थिती पाहता औरंगाबाद महानगरपालिकेने करोनाच्या नियमांची अमलबजावणी व्हावी म्हणून आणखी एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे.

Maharashtra Times 22 Dec 2021, 8:10 am
औरंगाबाद : राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता औरंगाबाद महानगरपालिका प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे आता विनामास्क वाहने चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईबाबत महापालिका पाउल उचलणार आहे. तर विनामास्क वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांचे त्यांच्या वाहनांसह फोटो काढून ते आरटीओ कार्यालयाकडे देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम omicron


करोनाबाबत औरंगाबाद जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने सुरवातीपासूनच कठोर भूमिका घेतल्याने परिस्थिती इतर जिल्ह्यांपेक्षा आटोक्यात असल्याच पाहायला मिळालं. याचप्रमाणे लसीकरणबाबत सुद्धा 'औरंगाबाद पॅटर्न'ची राज्यभरात चर्चा झाली होती. त्यात आता राज्यभरातील ओमिक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांची परिस्थिती पाहता औरंगाबाद महानगरपालिकेने करोनाच्या नियमांची अमलबजावणी व्हावी म्हणून आणखी एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. यापुढे विनामास्क वाहने चालवणाऱ्या वाहनचालकांचे त्यांच्या वाहनांसह फोटो काढून ते आरटीओ कार्यालयाकडे देण्यात येणार आहे. त्यांनतर आरटीओ थेट वाहनांवर दंडात्मक कारवाई करणार आहे.

दिवसभरात ९० जणांवर कारवाई...

विना मास्क वाहन चालकाविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने दिल्यानंतर, मंगळवारी हरसुल टी- पॉईंट, बाबा पेट्रोल पंप, सिडको बस स्थानक चौक आशा ठिकाणी एकूण ९० वाहनचालकांचे फोटो काढून आरटीओ कार्यालयाकडे पाठविण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज