अ‍ॅपशहर

एसटी काही सुरू होईना, शिवशाही काही परवडेना; प्रवाशांचे आतोनात हाल

संप सुरू होण्यापूर्वी औरंगाबादमार्गे जाणाऱ्या इतर बस औरंगाबाद आगारातून दिवसांतून शंभर पेक्षा अधिक बस सुटत होत्या. ज्याचे तिकीट ३३० रुपायांच्या जवळपास होते. मात्र, आता शिवशाहीचं भाडं ५१५ द्यावे लागत असल्याने प्रवाशांना मोठं नुकसान सहन करावे लागत आहे.

Maharashtra Times 3 Dec 2021, 1:27 pm
औरंगाबाद : गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजूनही तोडगा निघाला नसून राज्यभरातील आगारात कर्मचारी अजूनही ठाम मांडून बसले आहेत. तर याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे लालपरी बंद असल्याने जास्तीचे पैसे देऊन शिवशाहीने प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम st bus news


विलीकरणाच्या मागणीसाठी गेली २३ दिवस झालेत. एसटी कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास ७०० पेक्षा अधिक बस जागेवरच उभ्या आहेत. तर औरंगाबादहुन पुण्याला जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून शिवशाही बस सोडण्यात येत आहे. मात्र, शिवशाहीचं भाडं ५१५ रुपये असल्याने नेहमी येणाऱ्या जाणाऱ्यांना आणि अपडाऊन करणाऱ्या लोकांच मोठं आर्थिक नुकसान होत आहे.

Omicron : टेन्शन वाढलं! महाराष्ट्रात २८ ओमिक्रॉन संशयित रूग्ण; १० जण एकट्या मुंबईत
एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या पुण्यासाठी औरंगाबाद आगारातून ९ ते १० शिवशाही बस सोडल्या जात असून त्याचं भाडं ५१५ रुपये आहे. लालपरी बंद असल्याने प्रवाशांना दुसऱ्या पर्याय नसल्याने शिवशाहीनेच प्रवास करावा लागत आहे. संप सुरू होण्यापूर्वी औरंगाबादमार्गे जाणाऱ्या इतर बस औरंगाबाद आगारातून दिवसांतून शंभर पेक्षा अधिक बस सुटत होत्या. ज्याचे तिकीट ३३० रुपायांच्या जवळपास होते. मात्र, आता शिवशाहीचं भाडं ५१५ द्यावे लागत असल्याने प्रवाशांना मोठं नुकसान सहन करावे लागत आहे.

आतापर्यंत २१ कर्मचाऱ्यांचं निलंबन...

औरंगाबाद आगारातील आतापर्यंत २१ जणांना निलंबित करण्यात आले आहे. तर ४७ जणांची सेवासमाप्ती करण्याचे आदेश एसटी महामंडळकडून देण्यात आले आहे. तर दुसरीकडे एसटी कर्मचारी अजूनही आपल्या संपावर ठाम आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज