अ‍ॅपशहर

‘सरकार दुबळे; सीएम एकाकी’

राज्य सरकार कुठलाही निर्णय घेण्यात सक्षम नाही. त्यांना अनुभव नाही. असेही आता म्हणता येणार नाही. राज्याचा गाडा हाकताना लोकहिताचे निर्णय घ्यावे लागतात. सरकार मात्र सगळीकडे नुसती बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारमधील मंत्री मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतात आणि मुख्यमंत्री एकटे पडले आहेत, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगाविला.

Maharashtra Times 14 May 2016, 12:52 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad pruthviraj chavan attaks on cm
‘सरकार दुबळे; सीएम एकाकी’


राज्य सरकार कुठलाही निर्णय घेण्यात सक्षम नाही. त्यांना अनुभव नाही. असेही आता म्हणता येणार नाही. राज्याचा गाडा हाकताना लोकहिताचे निर्णय घ्यावे लागतात. सरकार मात्र सगळीकडे नुसती बघ्याची भूमिका घेत आहे. सरकारमधील मंत्री मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भूमिका घेतात आणि मुख्यमंत्री एकटे पडले आहेत, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगाविला.

चव्हाण म्हणाले,‘हे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांना अनुभव नाही, असे म्हटले जात होते, पण आता खूप कालावधी उलटून गेला. तरीही सरकारच्या कार्यपद्धती सुधारणा नाही. एप्रिल महिन्यात महसूलमंत्र्यांनी लातूर, बीड आणि उस्मानाबादमधील जनावरांच्या छावण्या बंद करण्याचे फर्मान सोडले. दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना एका मंत्र्याने असा आदेश देणे किती चुकीचे आहे. आम्ही आरडाओरड केल्यानंतर मुख्यमंत्र्यांना सायंकाळी सारवासारव करावी लागली. सरकारमध्ये मुख्यमंत्री एकटे पडत आहेत. सरकारी अधिकारीही त्यांचे ऐकत नाहीत. किंबहुना त्यांनीही हताशपणे ही भूमिका मांडली आहे. दुष्काळावर मात करताना सरकारला अनेक गोष्टी टाळता आल्या असत्या पण त्यांच्यात एकवाक्यता नसल्याने सगळे गणितच बिघडले आहे.’

‘आमच्या सरकारमध्येही मित्रपक्षाशी कसे ‘मधूर’ संबंध होते, हे सगळ्यांना माहिती आहे, पण राज्याचा विकास साधताना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून योग्य निर्णय घ्यावे लागतात. मुख्यमंत्र्यांना त्याचा अनुभव नाही, हे आजवरच्या वाटचालीवरून सिद्ध होते. बेकायदा इमारतींना नियमित करण्यासाठी माझ्यावर खूप दबाव होता. या सरकारने मात्र तत्काळ निर्णय घेतला. कोर्टाने हा निर्णय रद्द केल्यावर त्यांना गांभीर्य कळाले. एलबीटी बंद करण्याचा निर्णय अत्यंत मूर्खपणाचा आहे. त्या निधीतून औरंगाबाद पालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार तरी करता येत होते. ही पालिका कशीही चालो पण निधीचा स्त्रोत येणे आवश्यक आहे. सरकारला हे कळालेच नाही,’ असा दावा त्यांनी केला.

मग स्फोट घडविला कुणी?

मालेगाव बाँबस्फोटात साध्वी प्रज्ञासिंह यांना एनआयएने क्लिन चीट दिला. त्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले,‘मालेगाव स्फोटाच्या चौकशीत तपास यंत्रणांनी प्रज्ञासिंह यांच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याचा तपास पुढे एनआयएकडे सोपविला होता. आता त्यांनी क्लिन चीट दिला. एनआयएची भूमिका अचानक कशी बदलली याचा विचार करणे गरजेचे आहे. याप्रकरणी अन्य काही जणांना पकडले होते. पुढे त्यांना सोडण्यात आले. मग प्रश्न असा उपस्थित होतो की स्फोट घडविला कुणी?’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज