अ‍ॅपशहर

आयफोनच्या आमिषाने ३९ हजाराची फसवणूक

ऑनलाइन आयफोन देण्याचे आमिष दाखवून तरुणीला ३९ हजाराचा गंडा घालण्यात आला. १५ एप्रिल २०१६ रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी इंदोरच्या दोन आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Times 23 Aug 2016, 3:00 am
ऑनलाइन आयफोनच्या आमिषाने
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
आयफोनच्या आमिषाने ३९ हजाराची फसवणूक

दाखवून ३९ हजाराची फसवणूक
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
ऑनलाइन आयफोन देण्याचे आमिष दाखवून तरुणीला ३९ हजाराचा गंडा घालण्यात आला. १५ एप्रिल २०१६ रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी इंदोरच्या दोन आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जवाहरनगर भागातील एका २३ वर्षांच्या तरुणीने इन्स्टाग्राम या मोबाइल अॅपवर अॅपल आयफोन ५ किंवा ६ ऑनलाइन पाहिजे असल्याचा मेसेज अपलोड केला होता. यानंतर या तरुणीच्या मोबाइल एक मेसेज आला. इंदोर येथील संदेश व राम बाबू भट यांनी तिच्याशी संपर्क साधला. आयफोन हवा असल्यास त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या एका खात्याचा क्रमांक सांगितला. या खात्यावर ३९ हजार रुपये भरण्याचे या तरुणीला सांगण्यात आले. या तरुणीने १६ एप्रिल रोजी ही रक्कम या खात्यावर भरली. तरुणीने पैसे भरल्यानंतर मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता हा मोबाइल बंद करण्यात आला होता. तिने मेसेज पाठवले असता या मेसेजला देखील या आरोपींनी प्रतिसाद दिला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमादार सुरेश नरवडे याप्रकरणी तपास करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज