अ‍ॅपशहर

नागरिकांच्या सतर्कतेने खिसेकापू गजाआड

नागरिकांच्या सतर्कतेने खिसेकापूला रंगेहात पकडण्यात आले. सोमवारी महानगरपालिकेसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Times 31 Aug 2016, 3:00 am
नागरिकांच्या सतर्कतेने खिसेकापू गजाआड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
नागरिकांच्या सतर्कतेने खिसेकापू गजाआड

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
नागरिकांच्या सतर्कतेने खिसेकापूला रंगेहात पकडण्यात आले. सोमवारी महानगरपालिकेसमोर हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी महानगरप‌ालिकेमध्ये बेगमपुरा व बुढीलेन वॉर्डाच्या पोटनिवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी होती. मनपा कार्यालयासमोर गर्दीमध्ये संदीप बाबुराव चांदणे (वय ३०, रा. फाजलपुरा) हा तरुण उभा होता. गर्दीचा फायदा घेत संशयित आरोपी सचिन भगवान तांबे (वय २६, रा. मिसारवाडी) याने चांदणे यांच्या खिशातून सात हजार रुपये व मनोहर अंबादास बनकर यांच्या खिशातून २० हजार रुपयांचे पाकीट मारले. ही रक्कम दुसऱ्या साथीदाराच्या हवाली करून आरोपी तांबे पसार होत होता. मात्र, नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी सचिन तांबेला पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जमादार शिंदे तपास करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज