अ‍ॅपशहर

क्रेडाई प्रदर्शनात ५ दिवसात १३५७ घरांचे बुकींग

बांधकाम व्यावसायिक घर खरेदी करू इच्छिणारे नागरिक यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र बनलेल्या क्रेडाई ड्रीम होम या प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. पाच दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनात ८,७६० नागरिकांनी भेट दिली दिली व १,३५७ घराचे बुकिंग झाले आहे. क्रेडाईच्या या पाचदिवसीय गृहप्रदर्शनाला औरंगाबाद करांसह मराठवाड्यातील ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला.

Maharashtra Times 11 Oct 2016, 3:00 am
क्रेडाई प्रदर्शनात ५ दिवसात १३५७ घरांचे बुकींग
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
क्रेडाई प्रदर्शनात ५ दिवसात १३५७ घरांचे बुकींग

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद
बांधकाम व्यावसायिक घर खरेदी करू इच्छिणारे नागरिक यांच्यासाठी आकर्षणाचे केंद्र बनलेल्या क्रेडाई ड्रीम होम या प्रदर्शनाचा रविवारी समारोप झाला. पाच दिवस सुरू असलेल्या या प्रदर्शनात ८,७६० नागरिकांनी भेट दिली दिली व १,३५७ घराचे बुकिंग झाले आहे. क्रेडाईच्या या पाचदिवसीय गृहप्रदर्शनाला औरंगाबाद करांसह मराठवाड्यातील ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला.
अनेकांनी सहकुटुंब प्रदर्शनाला भेट देऊन गृहप्रकल्पांची माहिती घेतली. घर बांधणी आणि गृह सजावटीच्या साहित्यांचीही दालने होती. प्रदर्शनाला भेट दिलेल्यांना आयोजकांतर्फे दररोज पाच जण निवडून त्यांना विशेष बक्षिसे देण्यात आली. बांधकाम व्यावसायिक क्षेत्रामधील मराठवाडा कन्सट्रक्शन, सूरज ग्रुप व गया ग्लोबल यांनी बेस्ट स्टॉलचे पारितोषिक पटकावले. बांधकाम व्यवसाय व्यतिरिक्त क्षेत्रामध्ये एच.डी.एफ.सी व डेन्युज बेलमार्ट यांना पारितोषके देण्यात आले. पेपलेस इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन कौतुक पुरस्कारचा मानकरी अंकित अग्रवाल व विशेष परिश्रमाबद्दल बालाजी येरावार यांचा सन्मान करण्यात आला. यासाठी सुनील पाटील, विकास चौधरी, रवी वट्टमवार, संग्राम पटारे, आशुतोष नावंदर, विजय सक्करवार, सुनिल बेदमुथा, जुगलकिशोर तापडिया, राजेंद्रसिंग जबिंदा, प्रमोद खैरनार, पापालाल गोयल,व पदाधिकारीवर्गाने परिश्रम घेतले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज