अ‍ॅपशहर

पोलिस बंदोबस्तात मेहंदीच्या वडिलांचा अंत्यविधी

कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदीच्या वडिलांचा शुक्रवारी मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस बंदोबतात मनपा जवळील स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडला. यासाठी नाशिक तेल येथून इम्रान मेहंदीला शहरात आणले होते.

Maharashtra Times 23 Oct 2016, 10:29 pm
पोलिस बंदोबस्तात मेहंदीच्या वडिलांचा अंत्यविधी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
पोलिस बंदोबस्तात मेहंदीच्या वडिलांचा अंत्यविधी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
कुख्यात सुपारी किलर इम्रान मेहंदीच्या वडिलांचा शुक्रवारी मृत्यू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिस बंदोबतात मनपा जवळील स्मशानभूमीत अंत्यविधी पार पडला. यासाठी नाशिक तेल येथून इम्रान मेहंदीला शहरात आणले होते.
पाच खुनांचा आरोप असलेला इम्रान मेहंदी सध्या नाशिक येथील कारागृहात आहे. त्याचे वडील नासेर शेख (वय ६९) यांचा शनिवारी मृत्यू झाला. मृत्यूनंतर मेंहदीला अंत्यसंस्कारासाठी शहरात आणण्यात आले. नाशिक पोलिसांच्या बंदोबस्तात रात्री दहा वाजेच्या सुमारास मेहंदी शहरात पोचला. वडिलांचा अंत्यविधी पार पडल्यानंतर त्याला पहाटे तीन वाजता पुन्हा नाशिककडे रवाना करण्यात आले. या अंत्यविधी दरम्यान पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यामध्ये गुन्हेशाखेची तीन पथके, बेगमपुरा पोलिस असा एकूण ३० कर्मचारी अधिकाऱ्यांचा बंदोबस्तामध्ये समावेश असल्याची माहिती गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज