अ‍ॅपशहर

सैराट जोडपे पोलिसांच्या ताब्यात

क्रांतिचौक पोलिसांनी मंगळवारी सकाळी सिद्धार्थ गार्डन समोरील एका लॉजजवळून प्रेमीयुगल जोडप्याला ताब्यात घेतले. भोकरदन येथून दोन दिवसांपूर्वी पलायन केलेले हे चुलत भाऊ-बहीण आहेत. त्यांच्या नातेवाईकांना बोलावून त्यांच्या ताब्यात या दोघांना देण्यात आले.

Maharashtra Times 30 Nov 2016, 3:00 am
भोकरदनवरून पलायन केलेले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
सैराट जोडपे पोलिसांच्या ताब्यात

सैराट जोडपे पोलिसांच्या ताब्यात
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद
क्रांतिचौक पोलिसांनी मंगळवारी सकाळी सिद्धार्थ गार्डन समोरील एका लॉजजवळून प्रेमीयुगल जोडप्याला ताब्यात घेतले. भोकरदन येथून दोन दिवसांपूर्वी पलायन केलेले हे चुलत भाऊ-बहीण आहेत. त्यांच्या नातेवाईकांना बोलावून त्यांच्या ताब्यात या दोघांना देण्यात आले.
मंगळवारी सकाळी दहा वाजता पृथ्वी लॉजजवळ एका स्कॉर्पियो कारमध्ये एक जोडपे भांडत होते. त्यांचा वाद एका रिक्षाचालकाने पाहिला. त्यांने क्रांतिचौक पोलिसांना घटनेची माहि‌ती दिली. काही वेळातच दामिनी पथकाने घटनास्थळ गाठत या दोघांना ताब्यात घेत क्रांतिचौक पोलिस ठाण्यात आणले. या दोघांची चौकशी करण्यात आली. हे दोघे चुलत भाऊ-बहीण असून दोन दिवसांपूर्वी पलायन करून शहरातील लॉजमध्ये राहत असल्याची माहिती त्यांनी दिली. या दोघांच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले. त्यांचे नातेवाईक देखील त्यांच्या शोधातच होते. दोघांना समज देत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज