अ‍ॅपशहर

घनवेदपारायण महोत्सव आजपासून

वेदाध्याय परंपरेत महत्त्वाचे स्थान असलेल्या शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखा घनवेदपारायण महोत्सवाला मंगळवारी (२८ फेब्रुवारी) शोभायात्रेने प्रारंभ होत आहे.

Maharashtra Times 28 Feb 2017, 3:00 am
घनवेदपारायण महोत्सव आजपासून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
घनवेदपारायण महोत्सव आजपासून

म. टा. प्रतिनिधी औरंगाबाद
वेदाध्याय परंपरेत महत्त्वाचे स्थान असलेल्या शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखा घनवेदपारायण महोत्सवाला मंगळवारी (२८ फेब्रुवारी) शोभायात्रेने प्रारंभ होत आहे.
गारखेडा परिसरातील आजुबाई मंदिरात हा महोत्सव होणार आहे. मराठवाड्यात प्रथमच घनवेदपाठ पारायण सोहळा होत असून तेलंगणा, वाराणसी येथील घनपाठी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजन समितीचे महेश पूर्णपात्रे यांनी दिली. ते म्हणाले, वेदमूर्ती शुभम दत्तात्रय जोशी, वेदमूर्ती वैभव श्रीराम मांडे शुक्ल यजुर्वेद घनवेदपारायणाचे पठण करणार आहेत. तेलंगणा-आदिलाबादचे मठाधिपती योगानंद सरस्वती स्वामीजी यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी वाजता शोभायात्रा आणि दीपप्रज्वलनाने महोत्सवाला सुरुवात होईल. गारखेडा परिसरातील आजुबाई मंदिर ते गजानन मंदिरापर्यंत शोभायात्रा काढली जाणार आहे. शोभायात्रेनंतर दीपप्रज्वलनाने घनपाठ पारायणाला प्रारंभ होईल. २५ मार्चपर्यंत रोज सकाळी ते १२ दरम्यान हे पारायण सुरू राहणार असून भाविकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक दत्तात्रय जोशी (निलजगावकर), गणेश जोशी, अनंत पांडव, विजय जोशी, जीवन गुरू भोगावकर, संतोष पटवर्धन, पंकज जावळे यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज