अ‍ॅपशहर

जेएनइसीतील ६३ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट्स

जवाहरलाल नेहरू इंजिनीअरिंग कॉलेजमधील तब्बल ६३ विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्हूमध्ये नोकरी मिळाली आहे. काही विद्यार्थ्यांची रुजू होण्यासाठीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. त्यानंतर या वर्षातील प्लेसमेंट्सचा आकडा वाढू शकतो. विविध नामांकित कंपन्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची थेट प्लेसमेंट होण्याची ही बहुदा औरंगाबादमधील पहिलीच वेळ आहे.

Maharashtra Times 19 Apr 2017, 3:00 am
जेएनइसीतील ६३ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट्स
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aurangabad times
जेएनइसीतील ६३ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट्स

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

जवाहरलाल नेहरू इंजिनीअरिंग कॉलेजमधील तब्बल ६३ विद्यार्थ्यांना कॅम्पस इंटरव्हूमध्ये नोकरी मिळाली आहे. काही विद्यार्थ्यांची रुजू होण्यासाठीची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. त्यानंतर या वर्षातील प्लेसमेंट्सचा आकडा वाढू शकतो. विविध नामांकित कंपन्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची थेट प्लेसमेंट होण्याची ही बहुदा औरंगाबादमधील पहिलीच वेळ आहे.

जेएनइसी कॅम्पसमधील इंटरव्ह्यूमधून नोकरी मिळालेले हे सर्व विद्यार्थी २०१६-१७ या वर्षाच्या बॅचचे आहेत. नोकरी मिळालेल्या या विद्यार्थ्यांना दोन ते साडेचार लाखापर्यंतचे पॅकेज देण्यात आले आहे.

कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये अॅमेझोन, यार्दी सॉफ्टवेअर व मिडासकेअर फार्मा या कंपन्यांचा सहभाग होता. याआधीच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये टीसीएस, ग्रीव्हज् कॉटन या कंपन्यांनी विद्यार्थ्यांना नोकरीची संधी दिली होती. विद्यार्थ्यांना उत्पादन, देखभाल-दुरुस्ती, डिझाइन, आयटी, डाटा अॅनालिसीस आदी विभागांत काम करण्याची संधी मिळणार आहे. प्रशिक्षण आणि भरती विभागाचे प्रमुख डॉ. अभय कुलकर्णी यांनी सांगितले की, यंदा काही नवीन कंपन्यांनीही सहभाग नोंदवला. या प्रक्रियेत कंपन्यांनी तिहेरी निवड चाचणीचा अवलंब केला. यात अॅप्टिट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन, इंटरव्ह्यू आदी प्रक्रियांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांना ही संधी मिळवून देण्यासाठी प्रा. आस्मा हुसेन, प्रा. श्रीकृष्ण पवार आणि अन्य विभागाच्या समन्वयकांनी परिश्रम घेतले. एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, विश्वस्त प्रताप बोराडे, प्राचार्य डॉ. सुधीर देशमुख आणि डॉ. हरिरंग शिंदे यांच्यासह उपप्राचार्यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी डॉ. आर. आर. देशमुख, सर्व विभाग प्रमुख, डॉ. विजया मुसंडे, डॉ. एम.एस. कदम, डॉ. जे. एस. राणा, डॉ. एस. बी. शिंदे आणि प्रा. एस.एन. जैस्वाल यांची उपस्थिती होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज